बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

19

मूल :- शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल हे विद्यालय दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 मध्ये 100 % निकालाची परंपरा कायम ठेवलेली असून आज दिनांक 28 मे 2024 ला विद्यालयातील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव ऍड अनिल वैरागडे तसेच कार्यक्रमचे विशेष अतिथी म्हणून श्री अशोक झाडे प्राचार्य नवभारत विद्यालय मूल व शाळेचे प्राचार्य श्री विनोद बोलीवार हे उपस्थित होते. विद्यालयामधून प्रथम क्रमांक कुमार गितेश प्रदीप गावतुरे 92.40 टक्के, तसेच द्वितीय क्रमांक कुमारी नंदिनी रुपेश रामगिरवार 92.00 टक्के तर कु. अर्पिता अशोक वाळके 91.40 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच विद्यालयातील संपूर्ण विद्यार्थांना शाळेचे प्राचार्य विनोद सर यांनी विद्यार्थी व पालकांना मोलाचं मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व तसेच मान्यवारांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं तोषी जयस्वाल यांनी केले व कार्यक्रमचे आभार प्रदर्शन कु रुहीना सय्यद यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले