लेखिका – कवयित्री गीता देव्हारे यांच्या ‘ तिच्या नजरेतून’ ललित लेख संग्रहास मिळाला पुरस्कार

21

 

चंद्रपूर- स्थानिक लेखिका आणि कवयित्री गीता देव्हारे रायपुरे यांच्या यशोदिप पब्लिकेशन द्वारा नुकत्याच प्रकाशित झालेल्या तिच्या नजरेतून या ललित लेख संग्रहाला प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर पुरस्कृत होनाजी गाडेकर स्मृती शिवांजली साहित्य सन्मान 2024 मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत श्री श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ३१ व्या शिवांजली साहित्य महोत्सवात प्रदान करण्यात आला. पहिल्यावहिल्या पुस्तकालाच हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे गीता देव्हारे – रायपुरे यांचे शहरातील साहित्य क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. गीता देव्हारे – रायपुरे या सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचच्या पदाधिकारी असून अनेक ठिकाणी त्यांचे लिखाण प्रकाशित होत असते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात हा पुरस्कार सोहळा उत्साहाच्या वातावरणात पार पडला.