शूरवी महिला महाविद्यालय मूल येथील विद्यार्थिनीचे सुयश.

43

दि.0३/0२/२०२४ ला विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथे *राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धे* चे *भारतीय निवडणूक प्रक्रियेत EVM प्रदर्शक भूमिका बजावते. होय/नाही* या विषयावर आयोजन केले होते. या स्पर्धेत *कु.सिद्धी माधव अलोणी*Bsc. आणि *कु. गौरी संजय शेरकी Bsc.* या विद्यार्थिनींनी आपल्या शूरवी महिला महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व केले. दोन्ही विद्यार्थिनींनी वादविवाद स्पर्धेत प्रभावीपणे आपली बाजू मांडली. यामध्ये *कु. सिध्दी आलोनी Bsc प्रथम वर्ष * हिने होय च्या बाजूने बोलतांना *द्वितीय क्रमांक* पटकावले असून त्यात *प्रमाणपत्र नगदी रक्कम व ट्रॉफी* चा समावेश आहे. श्री माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. कापर्तीवार सर व सचिव श्री. सुरावार सर यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. महाविद्यालयच्या प्राचार्या कु. हर्षा खरासे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयच्या सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व महाविद्यालयच्या विद्यार्थिनींनी सिद्धीच्या यशाबद्दल तिला शुभेच्छा दिल्या..