आपल्या देशात भारतीय संविधान विषयी प्रचंड अज्ञान भरलेले आहे, घटनेनुसार नागरिक यांची अधिकार व कर्तव्य बाबत एक तर ज्ञान नाही,

42

*आणि ज्यांना ज्ञान आहे ते पुढाकार घेऊन प्रबोधन करत नाही,??? चुपचाप बसून पाहत आहेत*

*भारत सरकारने,व शासनाने भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार पाहिजे त्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मिडीया द्वारे आजपर्यंत केलेला नाही,ही शोकांतिका आहे*
*भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१क.क.मध्ये १ते११ कर्तव्य नागरीकांना दिलेले आहे,व ते बंधनकारक आहे.*
*भारतीय संविधानाचे रक्षण करणे, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत,यांचे रक्षण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे,हे नागरिक म्हणून कर्तव्य आहे*
*मात्र आज देशात वेगळेच चित्र आहे.*
*भारतीय संविधान किती ताकदवान आहे,हे तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा चंद्रपूर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारताला दाखवून दिले आहे*
*जेव्हा एक तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा चंद्रपूर हे विद्यमान जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अटक वॉरंट काढुन थेट दिल्लीत घेऊन जातो,*
*असे उदाहरण आजपर्यंत भारताच्या इतिहासातील पहिले उदाहरण आहे.*
*एवढेच नाही तर तलाठी विनोद खोब्रागडे यांनी या पुर्वी सुद्धा तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा वर त्यांच्या समक्ष CBCID चौकशी थेट दिल्लीतुन बसविले, असे उदाहरण आजपर्यंत भारताच्या इतिहासातील पहिलेच उदाहरण आहे.*
*एवढेच नाही तर, विनोद खोब्रागडे तलाठी यांनी अनेक सनदी IAS अधिकारी,SDM, तहसीलदार,व अनेक कंपन्या वर फौजदारी कारवाई केली आहे,व FIR दाखल केले आहे,* *आणि आजही अनेक सनदी अधिकारी यांचावर फौजदारी अट्रासिटीचा केसेस न्यायालयात दाखल आहेत.*
*भारतात, महाराष्ट्रात, कुठेही आपल्या समाजावर अन्याय,अत्याचार झाला,व धार्मिक भावना दुखावल्या व ते इलेक्ट्रॉनिक मिडियावर प्रसिद्ध झाले तर कुनाची वाट न बघता तात्काळ त्यांचावर फौजदारी तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात विनोद खोब्रागडे दाखल करत असतो.*
*रामदेव बाबावर FIR प्रकरण असो, दिल्लीत संविधान जाळणारे असो, भिमा कोरेगाव प्रकरण असो, अंबाझरी नागपूर प्रकरण असो,साई वर्धा पावर कंपनी व इतर कंपन्या असो, कर्नाटक एम्टा कोलमाईन्स लि.कंपनी असो, चंद्रपूर शहरातील अनेक बिल्डर असो, मानीकगड सिमेंट कंपनी असो,की WCLअसो, इतक्या साऱ्या कंपन्या व अधिकारी, आणखी बरेच आहेत,यांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करु शकतो,व करून दाखविले आहे.*
*हे सर्व मी का लिहीत आहे,???व का सांगत आहे??????*
*हे सर्व मी भारतीय जबाबदार नागरिक,व भारतीय संविधानाचे अभ्यासक म्हणून, त्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी केली आहे.*
*म्हणूनच मी अधिकार वाणीने बोलत असतो, लिहीत असतो, फोकनाळ भाषणे देत नसतो,हे लक्षात घ्या.*
*म्हणून भारतीय नागरिकांनी भारतीय संविधान वाचुन त्याची अंमलबजावणी करावे.व अनुभव घ्यावा.*
*थोडक्यात भारतीय संविधानाची ओळख*
*दिनांक २६/नोव्हेंबर १९४९ भारतीय इतिहासातील महत्वाचा दिवस आहे.*
*आम्ही भारतीय लोकांनी स्व:तासोबत एक फार मोठ्ठी कमिटमेंट केली आहे.*
*आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सर्व मुल्ये ज्या देशात नांदतात असा भारत देश घडविण्याचे,अशा राष्ट्रबांधनीचे स्वप्न पाहिले,व ते स्वप्न भारतीय संविधानाच्या स्वरूपात, लेखी स्वरूपात नोंदविले.*
*थोडक्यात काय तर आम्ही “रुल ऑफ लाॅ “नेच म्हणजे कायद्याच्या राज्याने चालण्याचे ठरविले*
*आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, मनमानीचे नाही*
*भारतीय संविधानाने मा. सुप्रीम न्यायालय,व मा. उच्च न्यायालय,यांची सुद्धा निर्मिती केली आहे*
*संविधानीक पदावर बसलेले सनदी अधिकारी व इतर अधिकारी यांनी, असंविधानीक कामे करुन ,आपली प्रतिमा न्यायालयात मलीन होनार नाही,यांची खबरदारी घ्यावी*
*नैसर्गिक न्याय तत्वाचे नेहमीच पालन करावे.*
*भारतीय संविधानातील अनुच्छेद* *१,१३,१४,१५,१६,
१७,१९,२०,२१,२५,३२,५१क,क,७७,
१६६,१४१,३४०,
३४१,३४२,
*यावर समाज माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रेस,मीडियाचा माध्यमातून भारतीय संविधानाचे प्रबोधन करावे,व अंमलबजावणी करावे.*
*आता जास्त लिहीत नाही*
*मिशन इंडिया टी. व्ही.च्यानलवर भारतीय संविधान विषयावर आयु.विनोद खोब्रागडे यांची विशेष मुलाखत दिनांक २६/नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे, अवश्य बघा,व आपली प्रतिक्रिया कळवा,*
*धन्यवाद, जयभीम,जय संविधान*
*26/नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा, मंगलकामना ????????????????? शुभेच्छुक आपला अनुयायी
विनोद खोब्रागडे वरोरा चंद्रपूर*
*मो.९८५०३८२४२६*
*मो‌.८३२९४२३२६१*