✍️ अट्रासिटीचा फौजदारी प्रकरणात NBW नाॅन बेलेबल वारंट साठी अर्ज दाखल व मंजूर, आदेश पारित झाला पुढील पेशी तारीख १६/०९/२०२३ असून महाराष्ट्रातील पर्यटन मंत्री श्री .मंगल प्रभात लोढा, पर्यटन सचिव वारसा नायर सिंग मुंबई मंत्रालय, विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी नागपूर,श्री.रविद्र ठाकरे तत्कालीन जिल्हाधिकारी नागपूर,श्री.अजय अण्णासाहेब गुल्हाने उपायुक्त महानगरपालिका नागपूर,श्री.शेखर घाडगे उपविभागीय अधिकारी नागपूर,श्री.सुर्यकांत पाटील तहसीलदार नागपूर,श्री.राजेश देठे मंडळ अधिकारी नागपूर,श्री.उज्वल भोयर तलाठी अंबाझरी नागपूर,सह में.

25

*✍️ अट्रासिटीचा फौजदारी प्रकरणात NBW नाॅन बेलेबल वारंट साठी अर्ज दाखल व मंजूर, आदेश पारित झाला पुढील पेशी तारीख १६/०९/२०२३ असून महाराष्ट्रातील पर्यटन मंत्री श्री .मंगल प्रभात लोढा, पर्यटन सचिव वारसा नायर सिंग मुंबई मंत्रालय, विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी नागपूर,श्री.रविद्र ठाकरे तत्कालीन जिल्हाधिकारी नागपूर,श्री.अजय अण्णासाहेब गुल्हाने उपायुक्त महानगरपालिका नागपूर,श्री.शेखर घाडगे उपविभागीय अधिकारी नागपूर,श्री.सुर्यकांत पाटील तहसीलदार नागपूर,श्री.राजेश देठे मंडळ अधिकारी नागपूर,श्री.उज्वल भोयर तलाठी अंबाझरी नागपूर,सह में. गरुडा कंपनी व संचालक प्रवीणकुमार अग्रवाल, या मुख्य आरोपी विरुद्ध अट्रासिटीचा प्रकरणात NBW नान बेलेबल वारंट अर्ज दाखल झाला , सुनावणी झाली, आदेश पारित झाला असून पुढील पेशी दिनांक १६/०९/२०२३ ला आहे.*

*महाराष्टातील बहुचर्चित गाजत असलेल्या, नागपूर अंबाझरी प्रकरणात
,स.न.१/१/१मध्ये आजही नैसर्गिक तलाव असतांना, आरोपींनी बगीचा दाखवुन खाजगी गरुड कंपनीला १रुपया वार्षिक भाडे तत्वावर ३०वर्षाची बेकायदेशीर लिज दिली.व त्या गरुडा कंपनीचे चालक मालक संचालक यांनी, टिनाचे पत्रे सभोवती लावुन, सुरक्षा रक्षक ठेऊन, कुणालाही आंत प्रवेश न देता जनतेच्या पैशातून महानगरपालिका नागपूर यांनी ,६० वर्षापुर्वी बांधलेले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे, सांस्कृतिक, शैक्षणिक , आध्यात्मिक, वापरासाठी चे भवन,स्मारक बुलडोझर लावुन पाडले,व भुईसपाट केले, मागील २१० दिवसापासून अंबाझरी येथे नागपूर चे महिला मंडळ धरणे आंदोलन,न्याय व हक्कासाठी करीत आहे.अनेक बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस मिडीयाचा माध्यमातून प्रसिद्ध झाले, त्यामुळे मी व्यथित झालो.व या प्रकरणात अट्रासिटीची फौजदारी पीटिशन विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा संविधानाचा अभ्यासक तथा कायद्याच्या अभ्यासक तथा दबंग तलाठी वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी, भारतीय दंड संहिता १८६० चा कलम १२०ब,४०९,४२०,४६५,४६८,४७०,४७१,३४,व सह कलम ३,व अट्रासिटीचा अनेक नुसार,व अट्रासिटी कलमा नुसार फौजदारी पीटिशन दाखल केली होती, न्यायाधीश महोदय यांनी तत्काळ नोटीस ईशु केले होते, आरोपी अनेक खाजगी जेष्ठ वकील मंडळी मार्फत वरोरा न्यायालयात हजर होऊनही मागील आठ महिन्यापासुन न्यायालयात उत्तर दाखल करीत नव्हते.तर कंपनी व तलाठी आरोपी न्यायालयात हजर होत नव्हते, म्हणून काल सर्व आरोपी विरुद्ध,CRPC कलम ७३ नुसार NBW नान बेलेबल वारंन्ट आरोपी वर काढण्यासाठी फिर्यादी विनोद खोब्रागडे यांनी दिनांक२८/८/२०२३ रोजी,
माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे, अर्ज दाखल केला असून सुनावणी झाली आहे, अर्ज मंजूर झाला आहे,पुढील आदेशाकरीता दिनांक १६/०९/२०२३ तारीख आहे.पुढच्या तारखेला,जर आरोपी हजर झाले नाही तर आरोपीची प्रापर्टी CRPC कलम ८३नुसार जप्त करण्याची कारवाई करावी अशी मागणी न्यायालयात मी करणार आहे.मंत्रालय,व महसूल अधिकारी मध्ये प्रचंड खळबळ.??????? प्रश्न असा आहे की अंबाझरी येथे नैसर्गिक तलाव आजही असतांना आरोपींनी ४४एकर जमीन बगीचा दाखविलेच कसे?????? आणि खाजगी गरुड कंपनी ला लीजवर जमीन दिलीच कशी ????? कुठलेही सरकार लोकसेवकांना सनदी IAS अधिकारी यांना कायद्याच्या बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर कामे करण्याची परवानगी देत नाही व CRPC कलम १९७ संरक्षण देत नाही, हे लक्षात घ्या,यांचा अर्थ मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून हे बोगस कामे आरोपींनी केली आहे.आरोपी कडुन अनेक जेष्ठ खाजगी वकील मंडळी होती,तर फिर्यादी स्व:ता विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा संविधानाचा अभ्यासक तथा कायद्याच्या अभ्यासक तथा दबंग तलाठी वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनीच बाजु मांडली आहे.?????*
*जनहितार्थ जारी.*
*समाजहितासाठी.*
*देशहितासाठी.*
*राष्ट्रबांधनीसाठी.*
*समाजाने २४तास जागृत राहावे धन्यवाद ?*

*अपीलार्थी.*
*विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा.* *संविधानाचा अभ्यासक तथा कायद्याच्या अभ्यासक तथा दबंग तलाठी वरोरा जिल्हा चंद्रपूर.*
मो.९८५०३८२४२६
८३२९४२३२६१.