रविवारला मूल येथे भव्य आरोग्य व रक्तगट तपासणी मोफत औषध वितरण शिबीर

28

*नागरीकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आरोग्याची तपासणी करुन घ्यावी, संतोषसिंह रावत यांचे आवाहन .*

*( सदर शिबिरास तालुका काँग्रेसचे सहकार्य)*

*मूल : श्री माॅ दुर्गा मंदिर सेवा समिती मूल आणि संतोषसिंह रावत मित्र परिवार मूलच्या वतीने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था सावंगी मेघे, जनरल मेडीकल प्रॅक्टीशनर असोसिएशन मूल आणि सावली, केमीस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशन मूल आणि चंद्रपूर जिल्हा मेडीकल लॅबोरेटरी टेक्नाॅलाॅजीस्ट असोसिएशन आणि मुल तालुका काँग्रेसच्या सहकार्याने कार्ये जनकल्याणकारी, सामान्य जनतेच्या दारी हे ब्रिद डोळयासमोर ठेवून रविवार दिनांक 20 आँगस्ट 2023 रविवारला नवभारत विद्यालय मूल येथे आरोग्य तपासणी, मोफत औषध वितरण व रक्तगट तपासणी शिबीर आयोजीत करण्यांत आला आहे.* *आयोजीत शिबीरात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय सावंगी मेघे येथील ५६ तज्ञ डॉक्टर्सची टीम यात जनरल फिजीशियन, बालरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, दंत रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्र रोग ,मानसोपचार तज्ञ आणि त्वचारोग तज्ञ रूग्णांवर विनामूल्य उपचार करणार असून शिबिरात ब्लड प्रेशर, ई.सी.जी. मेमोग्राफी, ब्लड शुगर, सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या, गर्भवती माता व स्तनदा मातांची तपासणी, सिकलसेल चाचणी, बाहय रूग्ण सेवा आणि त्वचा आजावर वैद्यकिय सुविधा आणि विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी तयार केलेले फिरते कॅन्सर रूग्णालय बाहय रूग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध राहणार आहेत.* *शिबीरात आरोग्य तपासणी सोबतचं पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, ई गोल्डन कार्ड, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड सुध्दा काढण्यांत येणार असून शिबिरा मध्यें डेंग्यु, क्षयरोग, मधुमेह, कॅन्सर आदि विविध आजारांची माहिती पत्रक तसेच आजाराबाबतची जनजागृती तसेच समुपदेशन करण्यांत येणार आहे.*
*आयोजीत शिबिरात दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत मेडीकल लेबाॅरेटरी टेक्नालाॅजीस्ट असोसिएशनच्या सहकार्याने विनामूल्य रक्तगट व सिकलसेल तपासणी करून मिळणार आहे. परिसरातील गरजु नागरीकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने आयोजीत करण्यांत आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण करण्यात येणार आहे.* *तसेच गरीब व गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात येईल तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराचे मुख्य संयोजक दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डाॅ. अभ्युदय मेघे आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माॅ दुर्गा मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केले आहे.*
*कार्ये जनकल्याणकारी, सामान्य जनतेच्या दारी हे ब्रिद डोळयासमोर ठेवून 20 आँँगस्ट रोजी आयोजीत करण्यांत आलेल्या आरोग्य व रक्तगट तपासणी आणि मोफत औषध वितरण शिबिरात तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी. यासाठी संतोषसिंह रावत मित्र परीवारातील सर्व सदस्य काँग्रेस व कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी उत्साहाने कामाला लागले असून युवक आणि महिला कार्यकर्ते घरोघरी भेट देऊन शिबिराचा प्रचार करीत आहेत.*