मुल येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो रुग्णांनी घेतला लाभ* *रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा :- संतोषसिंह रावत

49

*शासनाची आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडली असून तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असून देखील अत्यावश्यक डॉक्टर व नर्स, तंत्रज्ञ कर्मचारी यांची भरती होत नसल्याने रुग्णालयात गेलेल्या रुग्णाला व गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही.उलट रेफर टू चंद्रपूर असेच सांगण्यात येते म्हणून एकाच छताखाली असंख्य रुग्णाला लाभ मिळावे यासाठी मा. दुर्गा मंदिर सेवा समिती मुल व दत्ता मेघे शिक्षण संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे यांचे मार्फतिने व तालुका काँग्रेस कमिटीच्या सहकार्याने आणि मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन मुल व सावली केमिस्ट अँड ड्रॅगीस्ट यांचे मदतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी,रक्तगट तपासणी मोफत औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.*
*जनकल्याणकारी सामान्य जनतेच्या दारी या उदात्त हेतूने रूग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा आहे,असे मत शिबिर उद्घघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, माजी जी.प.अध्यक्ष, श्री मॉं दुर्गा मंदिर सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.*
* शिबिरामध्ये जवळपास तीन हजार सातशे च्या वर रूग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.तसेच त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आले.*
*शिबिरामध्ये जनरल फिजीशियन,बालरोग तज्ज्ञ,नेत्ररोग,दंतरोग,स्त्री रोग,नाक,कान,घसातज्ज्ञ,अस्थिरोग,मानसोपचार,त्वचारोग आणि सर्जरी तज्ज्ञ उपस्थित होते.*
*यावेळी ब्लड प्रेशर , इसीजी ,मेमोग्राफी,ब्लड शुगर,सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या,गर्भवती माता व स्तनदा मातांची तपासणी,
लसीकरण,सिकल सेल चाचणी,बाहय रूग्ण सेवा, त्वचा आजार तपासणी इत्यादी सुविधा रूग्णांना देण्यात आल्या.*
*शिबिरा मध्ये विधानसभा विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी तयार केलेले फिरते रूग्णालय व कॅन्सर निदान केंद्र रूग्णांच्या सेवेकरिता उपलब्ध करण्यातआले होते.*
*शिबिरास्थळी प्रमुख आयोजक संतोषसिंह रावत शिबिराकडे लक्ष देत होते. शिबिरात शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाबासाहेब वासाडे,सचिव एडव्हो . अनिल वैरागडे यांनी भेट दिली.*
*शिबिराला मूल,सावली तालुक्यातील तसेच परिसरातील जवळपास तीन हजार सातशेच्या वर रूग्णांनी सेवेचा लाभ घेतला. याशिवाय कैंसर ग्रस्त 126, रक्तगट 180, व असंख्य जनरल आरोग्य तपासणी करण्यासाठी सावंगी मेघे डॉ .अभ्युदय मेघे, डॉ.निखिलेश नाकतोडे, संयोजक मुरलीधर उमाटे, अभिषेक टिकले, डॉ.अजय कौशिक,सचिन ठाकरे, सचिन आगलावे,शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. थेरे यांचे अधिंनस्थ आशा वर्कर, देवनिल नर्सिंग कालेजचे विद्यार्थिनी, उपजिल्हा रुग्णालय, नगर परिषद प्रशासन,स्थानिक जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सर्व डॉक्टर मंडळी, स्थानिक प्याथालाजिस्ट, यांनी अथक परिश्रम घेतले.*
* शिबिराच्या यशस्वीते साठी सहकार्य केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, संयोजक संजय पडोळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरूनूले, माजी सभापती, संचालक घनश्याम येनुरकर, राजू पाटील मारकवार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, राज्य सरचिटणीस गुरूदास चौधरी, संचालक संदिप कारमवार, बंडू गुरनुले, कैलाश चलाख, शांताराम कामडे, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार, माजी नगर सेविका ललिता फुलझेले, किशोर घडसे, राहुल मुरकुटे, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार सचिव शामला बेलसरे, राधिका बुक्कावार, दीपक वाढई,प्रशांत उराडे, सरपंच केमेकर, युवक अध्यक्ष पवन नीलमवार, हिमानी वाकुडकर, धीरज गोहणें,दशरथ वाकुडकर, सुमित आरेकर, श्याम पुठ्ठावार, रुपल रावत, राजेश रावत, लहू कडस्कर, स्वागत वणकर, सुनील मंगर, चतुर मोहुरले, राजेंद्र वाढई, सुरेश फुलझेले, लोमेश नागपुरे, संदीप मोहबे,विष्णू सादमवार,विवेक मुत्यलवार, औषधी वितरण धनंजय चिंतावार, किशोर गोगुलवार, टोंगे, उमेश चेपूरवार, नितीन राजा, संतोष रावत मित्र परिवार सदस्य, यांनी मेहनत घेतली.*
*यांचेसह तालुका,शहर,ग्रामिण कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी,
प्रमुख कार्यकर्ते तसेच तालुका महिला कॉग्रेंस कमेटीच्या पदाधिकारी दुर्गा मंदिर समिती सदस्यांनी व योग नृत्य परिवार सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.*