गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दिक्षांत समारंभ राष्ट्रपतींसह मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न

30

*श्री दीपक कटकोजवार यांच्या कडून साभार प्राप्त )*
चंद्रपूर
*गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली २०२१-२२ च्या दिक्षांत समारंभाचा भव्यदिव्य कार्यक्रम दि.५जुलै ला विद्यापीठाच्या प्रांगणात भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या विषेश उपस्थितीत पार पडला.यावेळी मंचावर महाराष्ट्राचे राज्यपाल व कुलपती रमेशसिंह बैस, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे आदि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर महामहीम यांनी महाराष्ट्राचा प्रथमच दौरा केला असल्याने आणि तो पण गोंडवाना विद्यापीठ दिक्षांत समारंभाकरीता त्यामुळे त्यांच्या दौ-याविषयी विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पालक वर्गात खुपच आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.*
*याप्रसंगी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी गोंडवाना विद्यापीठ च्या कार्यशैलीमुळे स्थानिक आदिवासी, मागासवर्गीयांना शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या संधी प्राप्त होत आहे. फार थोड्या खर्चात मिळालेले शिक्षणाद्वारे याठिकाणी विद्यार्थी पुढे पुढे जात असुन विद्यापीठाच्या चांगल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्याचे शिक्षण दिले जाते.
या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना पर्यावरण, नैसर्गिक संपत्ती व परंपरेचे जतन करण्यासाठी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी राज्यपाल व कुलपती रमेशसिंह बैस यांनी केलेल्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणातुन गोंडवाना विद्यापीठाचे नांव जगभर पोहचेल असा विश्वास बोलुन दाखवला सोबतच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विद्यापीठासाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करीत मुनगंटीवार यांचे कौतुक केले तर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या छोटेखानी भाषणात जिल्ह्यातील विकासकामांची माहिती दिली. यानंतर केवळ तीन जनांना पदवी,मेडल, प्रमाणपत्र देवून औपचारिकरित्या दिक्षांत समारंभाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले. इतर निमंत्रित प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कुलगुरू व इतर मान्यवरांच्या हस्ते पदवी सुवर्णपदक व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये चंद्रपूर घ्या नामांकित सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी माधुरी दीपक कटकोजवार ला एम.ए.हिंदी विषयांत (९.९४ आउट ऑफ १०) प्रथम मेरीट स्थान असे प्रचंड यश मिळाल्यामुळे तिला आज गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात सुवर्णपदक,पदवी व मेरीट प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. याकरिता माधुरी कटकोजवार ने सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर, उपप्राचार्य डॉ स्वप्नील माधमशेट्टीवार, हिंदी विभाग प्रमुख डॉ सुनिता बन्सोड, प्रा.शैलेन्द्रकुमार शुक्ल यांचे सहकार्य करणारे सर्व प्राध्यापक व महाविद्यालयीन कर्मचारी वृंदाचे आभार व्यक्त केले आहे.*