क्रांतीविर,शहीद श्रीमान बाबुराव शेडमाके यांचे चंद्रपूर मध्ये भव्य स्मारक तयार करावे,अशी मागणी आज सामाजिक कार्यकर्ते,जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे अभ्यासक, तथा दबंग तलाठी विनोद खोब्रागडे, यांनी आज क्रांतिकारी बाबुराव शेडमाके यांचा जयंती निमित्त,व पुतळ्याचे उद्घाटनप्रसंगी केले आहे.

57

*बल्लारपूर तालुक्यातील मौजा कोर्टीतुकुम येथे आज दिनांक 12/3/2023 रोजी शहीद क्रांतिकारी,विर बाबुराव शेडमाके यांच्या भव्य पुतळा स्थापनाचा कार्यक्रम मौजा कोर्टीतुकुम येथे पार पडला आहे.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्रीमहोदय महाराष्ट्र शासन हे होते.मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहु शकले नाही.*
*अध्यक्ष श्री विजय मडावी हे उपस्थित होते.*
*उद्घाटक म्हणून श्रीमान चंदेलसिंह चंदेल बल्लारपूर हे उपस्थित होते.*
*तर प्रमुख मार्गदर्शक दबंग तलाठी आयु. विनोदभाऊ खोब्रागडे उपस्थित होते.*
*
*प्रमुख पाहुणे श्री.भारतभाऊ आत्राम जनजाती सुरक्षा मंच तथा जिल्हा संयोजक व ईतर उपस्थित होते.*
*मार्गदर्शन करतांना दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी क्रांतिकारी विर बाबुराव शेडमाके यांचा कार्यावर प्रकाश टाकला.*
*1854 मध्ये,चांदागड (चंद्रपूर)चे जिल्हाधिकारी श्री.आर.एस.ऐलीस.यांचा माध्यमातून आदिवासी यांचा जमीनी बळजबरीने बळकाऊन,त्यांच्यावर अन्याय,अत्याचार ब्रिटीश सरकार करत होते.त्यांचा विरुद्ध,श्रीमंत घरान्यातील श्री.बाबुराव शेडमाके यांनी बंड केला,व 25 व्या वर्षी शहीद झालेले,क्रांतिकारी विर बाबुराव पुल्लसुर शेडमाके यांचा जिवनावर प्रकाश दबंग तलाठी विनोद खोब्रागडे हे आज कार्यक्रमाच्या माध्यमातून टाकले आहेत.*
*तसेच भगवान बिरसा मुंडा यांचावर सुद्धा प्रकाश टाकला,दोन्ही महापुरुष 25 व्या वर्षी देशासाठी कस शहीद झाले.हे सविस्तर समजावून सांगितले.*
*क्रांतिकारी विर बाबुराव शेडमाके यांचा भव्य स्मारक चंद्रपूर मध्ये करावे अशी मागणी,सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी केली आहे.*
*मागील 42 वर्षांपासून,चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन,शासन,आदिवासीचा जमीनी जबरदस्तीने बळकाऊन,कसे अन्याय अत्याचार,करत आहेत,आणि मागील 10 वर्षांपासून एक तलाठी विनोद खोब्रागडे प्रशासाना विरुध्द कसे बंड करुन,दिल्ली पर्यंत चंद्रपूरचा जिल्हाधिकारी यांचावर अटक वारंट काडुन,घेऊन जातात,व आदिवासीनां न्याय व मोबदला मागतात.याचा लेखाजोखा आज समाजासमोर मांडलेला आहे.*
*अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.*
*क्रांतिकारी विर बाबुराव शेडमाके यांचा जयंतीचा शुभेच्छा दिल्या.?????????*