मराठी-हिंदी पत्रकार असोसिएशन, समता संघर्ष फाऊंडेशन व स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने जर्नालिस्ट माधुरी कटकोजवार सन्मानित ???

53

 

*चंद्रपूर*
*शह रातील नामांकित सरदार पटेल महाविद्यालयातून बि. ए पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मास कम्युनिकेशन या विषयात मास्टर डिग्री गोंडवाना विद्यापीठातून 9.34 ( CGPA Out of 10 ) मार्क्स प्राप्त करीत मेरिट (टॉपर) यादीत स्थान मिळविले. व वयाच्या 22 व्या वर्षी इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात आपल्या करिअरला, महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रणी समजल्या जाणाऱ्या नामदार व जिल्हा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार , माजी मंत्री जयंतराव पाटील , महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकनकर , विधान परिषद* *आमदार अभिजित वंजारी आदी मान्यवरांच्या मुलाखती व बातचीतच्या माध्यमातून यशस्वीरीत्या सुरुवात केली.*
*करिअर सुरू ठेवतच पुढे एम. ए. हिंदी विषयात शिक्षण घेवून त्यामध्ये 9.94 ( CGPA Out of 10 )……99.4 % पर्सेंटेज प्राप्त करीत यश संपादन केले आहे. जर्नालिस्ट माधुरी कटकोजवार यांच्या अशा यशकार्याची दखल घेत चंद्रपूर येथील मराठी हिंदी पत्रकार असोशिएशन , समता संघर्ष फाऊंडेशन आणखी स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र दिक्षाभुमी वरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १२ मार्चला जागतिक महिला दिना निमित्ताने “राणी हिराई स्त्रिभूषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाबद्दल आयोजक आदरणीया अनुताई दहेगांवकर, सुनिलदादा पाटील, डि.एस.ख्वाजा यांचे व सर्व टिम चे शहरात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. मंचावर बल्लारपुरच्या माजी नगराध्यक्षा डॉ. श्रीमती रजनीताई हजारे, डॉ.भारतीताई दुधानी, माजी नगरसेवका रत्नमालाताई बावने आदी मान्यवर महिलांची उपस्थिती होती. तत्पूर्वी अनेकांना महिला आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर व आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी सन्मानित करून व्यस्ततेमुळे पुढील कार्यक्रमास रवाना झाले.*