वडगांव जुनी वस्ती,पठाणपुरा हनुमान मंदिर व भिवापूर तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिर योग वर्गाचा समापन समारंभ एकाच दिवशी संपन्न महिला प्रदेश कमेटी सदस्या सौ.स्मिताताई रेभनकर यांची उपस्थिती…!

66

*(सदर बातमी श्री दीपक कटकोजवार यांजकडून साभार प्राप्त …)*

*दि.१२फेब्रुवारीला चंद्रपूरातील महिला पतंजली योग समिती च्या वतीने, एकाच दिवशी वडगांव जुनी वस्ती,पठाणपुरा हनुमान मंदिर व भिवापूर हनुमान मंदिर या तिन्ही ठिकाणी मागील एक आठवड्यापासुन सुरू असलेल्या योग वर्गाचा समापन समारंभ महाराष्ट्र प्रदेश महिला पतंजली समितीच्या सदस्या सौ.स्मिताताई रेभनकर यांच्या उपस्थितीत पार पडला… याप्रसंगी सर्वश्री योग प्रशिक्षक मोहनराव मसराम,सौ.ज्योतीताई मसराम, सौ.मंगलाताई आखरे,माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, दीपक कटकोजवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. भिवापूर महिला योग समिती च्या प्रभारी पदी सौ.लताताई ठाकरे यांची निवड जाहिर करण्यात येवुन याठिकाणी निरंतर योग वर्ग सुरू ठेवण्याच्या उपक्रमाची जबाबदारी त्यांचेकडे देण्यात आली..योग साधिकांनी मा. स्मिताताई रेभनकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या तिन्ही केंद्रातील योगवर्गाच्या यशस्वीतेकरीता सौ.स्मिताताई श्रीगडीवार, चितवन चव्हाण,वंदना संतोषवार, वैशाली रामेडवार, शारदा डाखोरे, अंजलीला साठोने, मोहनराव मसराम सर,सौ.ज्योतीताई मसराम आदी प्रशिक्षकांनी साधकांना योग,प्राणायम व आसनांचे धडे दिले…*