रामनगर चपरासी काॅलनीतील गार्डन मध्ये योगा व आरोग्य शिबीर सुरू — जिल्हा महामंत्री सौ.अपर्णा चिडे यांची माहिती

51

*( श्री दीपक कटकोजवार यांजकडुन )*
*आज 14 ते 19 फेब्रुवारी पर्यंत आयोजित 7 ठिकाणी सात दिवसीय निशुल्क योगा प्राणायाम व आरोग्य शिबिराला सुरुवात झाल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा महिला पतंजली योग समितीच्या महामंत्री* *सौ.अपर्णाताई चिडे यांनी दिली असुन शिबिर दररोज सकाळी 6 ते 8 ज्या वेळेत डॉ.मुठाळ यांच्या दवाखान्याजवळील,चपरासी काॅलनीच्या गार्डन रामनगर, झोन क्र.2 मध्ये आहे. चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त श्री विपीन पालिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरात योग वर्गा सोबतच रोगमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.*
*या अभियानांतर्गत आपले शरीर निरोगी व स्वस्थ आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार , मनाची एकाग्रता , ,आनंदी जीवन ,रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या शिबिरांचे आयोजन डॉ. वनिता गर्जेलवार, डॉ.अश्विनी भारत ,आशा वर्कर -सुकेशनी शंभरकर,अंजु कोल्हेकर, प्रेमिला बावणे,मिर्झा सर आणि टीमच्या सहकार्याने आरोग्य शिबीरे याच ठिकाणी होत असल्याची माहितीही योग शिक्षिका सौ. चिडे यांनी दिली* *. *या संयुक्त उपक्रमाला महिला पतंजली योगा समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या तथा नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा प्रभारी सौ.स्मिताताई*रेभनकर जिल्हा प्रभारी -नसरीन शेख आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिबिराचा दुसरा दिवस असुन शिबिरा मध्ये आज योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, आसने ,योगा प्राणायाम ,सूक्ष्म व्यायाम ,मुद्रांचा अभ्यास व प्रात्यक्षिके शिबीरार्थीं कडुन करुन घेण्यात आले.*
*आजच्या शिबिराचा दुसरा दिवस आनंदाने उत्साहात साजरा करण्यात आला.*
*रोगमुक्त चंद्रपूर अभियाना तर्फे शिबिराला उपस्थित प्रत्येक साधक-साधिका यांचे आरोग्य तपासणी Weight, BP ब्लडप्रेशर,शुगर ची चाचणी (test) करण्यात आली शिबिराला 13 साधक -साधिका उपस्थित होते ..*