मूल तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सात पैकी चार क्षेत्रात काँग्रेसचे वर्चस्व तर भाजपाच्या ताब्यात तीन ग्रामपंचायत

90

*मुल – मुल तालुक्यातील पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत एकूण सात ग्रामपंचायती पैकी चार ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले असून तीन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात राहिल्या. काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात अतिशय संवेदनशील असलेल्या व सर्वांचे लक्ष लागलेल्या बेंबाळ ग्राम पंचायतीने काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनल दणदणीत एकहाती सत्ता आणत चांगदेव केमेकर सरपंच यांचा विजय झाला असून सदस्य पदी आशा शेंडे,कविता नंदीग्रामवार, अरूणा गेडाम,विनोद वाढई,देवाजी द्यनबॉईनवार,किशोर पगडपल्लिवर ,आशा मडावी , यांनी विजयश्री प्राप्त केली. तर भाजपचे चंद्रकांत गोहणे,प्रतिमा भडके दोन तर वंचित चा एक राकेश दहिकर विजयी झाले.आकापूर् येथे मागील चाळीस वर्षांपासून संदीप कारमवार यांचे नेतृत्वात काँग्रेस प्रणित गोंडवाना आदिवासी पॅनलने सरपंचासह आठ जागेवर भाजप प्रणित प्यानलचा पराभव करीत दणदणीत विजय संपादन केला. यात सरपंच भास्कर हजारे, सदस्य महेश उईकें, अर्चना उईके ,वनिता तीवाडे, साहिल येंनगंटीवार,भरती मेश्राम, प्रमोद गेडाम,ज्योती वाघाडे, यांनी विजय संपादन करून चाळीस वर्षाची परंपरा कायम ठेवली. बाबराळा ग्रा.पं.वर सात पैकी चार जागा खेचून आणत बहुमत प्राप्त केले. सरपंच धीरज गोहणे,विजयी झाले असून सदस्य ठुमदेव कोरडे, ताई निमगडे, अनिता नाहगमकर, यांच्या गळ्यात माळ पडली. भाजप प्रनितचे फक्त तीन उमेदवार निवडून आले. तर तीन गावं समाविष्ट असलेल्या चक दुगाळा ग्रा.पं. मधे चार उमेदवार बाजी मारले असून सरपंच प्रीती नरेश भांडेकर, विजई झाल्या.सदस्य म्हणून नरेंद्र वाढई ,दिलीप सातपुते, लता सातपुते हे विजयी ठरले, गडीसूर्ला ग्रा.पं. ग्राम विकास आघाडीच्या शारदा संजय येनुरकर सरपंचपदी विराजमान झाल्या. सदस्य विशाखा दुर्गे,रोप राऊत, रोहणाताई वाढई, सुवर्णा आकणपल्लीवार, प्रफुल मोहुर्ले, जयश्री गुंतीवार, यांनी बाजी मारली. उष्राळा ग्राम पंचयतीमध्ये भाजप प्रणित ग्राम विकास आघाडीने दहा पैकी आठ जागा ताब्यात घेऊन वर्चस्व प्रस्थापित केले. यात सरपंच प्रियंका लोकनाथ नर्मलवार,सदस्य, विनोद जिवतोडे, किरण कोरडे,सुचिता मानकर,उषा गुरनुले,कर्मवीर राऊत,उज्वला ढोले,निता जुंमनाके विजयी ठरल्या. काँग्रेस प्रानितला दोनवर समाधान मानावे लागले. बोंडाला ग्राम. पं. भाजप प्रणित आघाडीने बाजी मारली असून सरपंच सोनल बांगरे, सदस्य संतोष चूनारकर,जगदीश बांगरे, येवंता यरमे, बहुमत प्राप्त केले तर काँग्रेस प्रणित आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले. माजी सरपंच जालिंदर बांगरे, रोषणा बांगरे, रांजू नखाते,काँग्रेस पक्षाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात तसेच माजी पालकमंत्री आमदार विजय वडे्टीवार यांच्या मार्गदर्शनात लढविण्यात आल्या असून काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेते सं.गा.नी.योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार,माजी तालुका अध्यक्ष व माजी सभापती घनश्याम येनुरकर,तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक अध्यक्ष पवन नीलमवार,दीपक पा. वाढई, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,पॅनल नियोजन प्रमुख प्रशांत उराडे, माजी सरपंच उराडेताई, राजेंद्र कन्नमवार, बंडू गुरनुले, शांताराम कामडे , सुमित पा.आरेकर, माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, गोविंदा रोहनकर,ओम चावरे,पंकज गोहने, स्वागत वणकर, वनकर गुरुजी, इत्यादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मुल तालुक्यात काँग्रेस प्रणित आघाडीने संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात आपले वर्चस्व सिद्ध केले.*