आज दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

82

 

*हिंगणघाट / ( वर्धा )*

*हिंगणघाट तहसीलमध्ये सुरू झालेल्या प्रत्येक गिरणी व कंपनीची प्रशासनाने समिती गठीत करून चौकशी करावी,तसेच प्रभास मृत्यू प्रकरणातील फरार आरोपीं संचालक ला लवकरात लवकर अटक करून संचालिकाचा जामीन रद्द करावा .*

*आपणास माहित असावे की दिनांक 30/11/2022 रोजी रात्री हिंगणघाट परिसरातील कडजना गावात सुरु असलेल्या मानधनिया दाल मिलमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता.आणि कामगार प्रभासच्या मृत्यूची बातमी दडपण्याच्या उद्देशाने मानधनिया दाल मिलचा संचालक आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांना न कळवता 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी हिंगणघाट येथील स्मशानभूमीत प्रभासचा मृतदेह जाळला होता.मृत कामगार प्रभासच्या नातेवाइकांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत मांधानिया दाल मिलचे संचालीका आणि संचालकसह त्यांच्या सहकाऱ्यांवर कलम ३०४ अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई केली.यामध्ये ३ आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले असून मिलच्या संचालीकाला जामीन मिळाला आहे.व संचालक फरार असून पुढील तपास वर्धा पोलीस करत आहेत, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामगार अल्पवयीन असल्याची माहिती आहे.मृत प्रभास हा अल्पवयीन होता की प्रौढ, हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट परिसरात आजही हिंगणघाट क्षेत्रात अनेक गिरण्या, कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांना कामगार म्हणून ठेवले जात आहे.जो पूर्णपणे गुन्हा आहे,हा संपूर्ण प्रकार लक्षात घेऊन हिंगणघाट तहसीलमध्ये सुरू झालेल्या प्रत्येक गिरणी व कंपनीची प्रशासनाने समिती गठीत करून चौकशी करावी, आहे.जेणेकरून अल्पवयीन मुलांना कामगार होण्यापासून रोखले जाईल आणि अल्पवयीन मुलांना कामगार बनवणाऱ्या ठेकेदारांना तुरुंगात पाठवले जाईल.अशी मागणी घेवून आज दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा मॅडम यांना निवेदन देण्यात आले.निवेदन घेतल्यानंतर हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा मॅडम यांनी कामगार अधिकाऱ्यांशी बोलून चौकशी करण्याचे सांगितले आहे.मानधनिया दाल मिलमधील कामगार प्रभासच्या मृत्यूवरून हे स्पष्ट झाले आहे की, लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन काही बडे धनदांडगे अजूनही प्रौढ मुलांना मजूर बनवून त्यांची पिळवणूक करत आहेत, या संपूर्ण प्रकरणावर श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाने याची प्रामुख्याने दखल घेत अल्पवयीन मुलांना मजूर बनविणाऱ्या ठेकेदार आणि धनदांडग्यांचा खरा चेहरा प्रशासनासमोर आणण्याचा संकल्प केला आहे.तसेच प्रभास मृत्यू प्रकरणातील फरार आरोपींना संचालक ला लवकरात लवकर अटक करून संचालिकाचा जामीन रद्द करावा, अशी मागणीही वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडे केली आहे.*