देवाभाऊ सरकारने वेळेत KYC न करणा-या लाडक्या बहिणींनाही योजनेचा लाभ द्यावा :
राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा माधुरी कटकोजवार
ज्या लाडकी बहिण योजनेमुळे महाराष्ट्रात भाजपाप्रणीत महायुतीचे सरकार बहुमतात पुन्हा आले त्याच फडणवीस सरकारने अन्याय करणारा घेतलेला निर्णय म्हणजे KYC न करणा-या लाडक्या बहिणींना या योजनेच्या लाभापासून मागील तिन महिन्यापासुन वंचीत ठेवले आहे. वंचित ठेवणारा देवाभाऊ सरकारचा हा निर्णयाला शिथील करुन सरसकट ज्या ज्या महिला व मुलींना यापुर्वी योजनेचा लाभ मिळाला होता. त्या सर्वांना या योजनेचा लाभ पुर्ववत सुरू करावा अशी लोकप्रिय मागणी जर्नलिस्ट तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या जिल्हाध्यक्षा माधुरी कटकोजवार यांनी जिल्हा पालकमंत्री नामदार अशोक उईके, माजी पालकमंत्री व विद्यमान बल्लारपूर चे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचेकडे जाहिरपणे केली आहे….!




