Google search engine
Home Maharashtra जनतेच्या दुःखात उभा राहणारा नेता म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार

जनतेच्या दुःखात उभा राहणारा नेता म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार

36

जनतेच्या दुःखात उभा राहणारा नेता म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार

पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील श्री. मुकुंद सुरेश भुरसे यांना तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची धक्कादायक बातमी समजताच भुरसे कुटुंबावर जणू आकाश कोसळले. हलाखीच्या परिस्थितीत लागणारा उपचारांचा प्रचंड खर्च यामुळे संपूर्ण कुटुंब निराशेच्या गर्तेत सापडले होते.अशा अंधारलेल्या आणि कठीण क्षणी आ. सुधीर मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आले. कोणताही विलंब न करता त्यांनी मुंबईतील नामांकित हिंदुजा रुग्णालयात आवश्यक शस्त्रक्रियेची तसेच जेवण व राहण्याची संपूर्ण व्यवस्था करून दिली. धर्मदाय योजनेच्या माध्यमातून तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांचा खर्च मोफत करून दिला आणि रेडिएशन थेरपीसाठी अतिरिक्त ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला. ज्यामुळे पुढील उपचारांचा मार्गही सुलभ झाला.

   

मुंबई येथील नामांकित हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुकुंद भुरसे यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा किरण उजळला. केवळ वैद्यकीय मदतच नव्हे, तर “तुम्ही एकटे नाही” हा मायेचा आणि धीर देणारा संदेश देत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या कुटुंबाला मानसिक आधार दिला.संकटात माणुसकी जपणाऱ्या, संवेदनशीलतेने आणि तत्परतेने मदतीचा हात पुढे करणाऱ्या या कार्यामुळे एका कुटुंबाला नवे जीवन मिळाले. डोळ्यांत अश्रू आणि मनात अपार कृतज्ञता ठेवत भुरसे कुटुंबाने या मोलाच्या सहकार्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मनापासून आभार व्यक्त केले.