पो नि विजय राठोड व रायटर पो हवालदार रूपेश मुल्लेमवार यांनी नागभीड पो स्टे अप क्र 75 / 2024 कलम 302 अन्वये आरोपी नामे अंबादास लक्ष्मण तलमले रा मौशी ता नागभीड जि चंद्रपुर याने पत्नीने दारू पिण्याकरीता पैसे दिले नाही त्याने पत्नी व दोन मुलींच्या डोक्यावर क़ुर्हाडीने मार करून त्यांची हत्या दिनांक 03 / 03 /2024 रोजी केली होती . सदर प्रकरणात पो निरीक्षक विजय राठोड यांनी चंद्रपुर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते .
सदर प्रकरणात सुनावनी नंतर दिनांक 31 / 01 / 2026 रोजी आरोपी अंबादास लक्ष्मण तलमले यास कलम 302 अन्वये दोषी ठरवून आजन्म कारावास तसेच 1000/ = रुपये दंडाची सुनावनी केली . सदर गुन्ह्याचा तपास पो नि विजय राठोड , रायटर पो हवाल.रूपेश मुल्लेमवार ,पो उप निरीक्षककुंदन वाघमारे , सरकारी अभियोक्ता एस आर डेंगावार यांनी सरकार पक्षाची बाजू मांडून आरोपिस शिक्षा मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.





