प्रेस नोट
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी विनोद खोब्रागडे पटवारी तथा सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांनी दाखल केलेल्या क्रिमीनल रिट पीटीशन मध्ये कंपनीला व महसूल अधिकारी यांना उत्तर मागताच में.मानीकगढ सिमेंट कंपनी व में अल्टाटेक सिमेंट कंपनी व महसूल अधिकारी मध्ये प्रचंड खळबळ💥💥💥💥
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबी हा संपूर्ण गाव पेसा अंतर्गत असतानाही महाराष्ट्र शासनाकडुन कुठलीही परवानगी नसताना,मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी जमीन महसूल संहिता १९६६ चां कलम ४८नुसार भाडेपट्याने जमीन घेऊन, भुसंपादन न करता मानीकगढ सिमेंट कंपनीला दिली
सदर कंपनीने भाड्याने जमीन घेऊन, कुठलाही मोबदला न देता ४५वर्षापासुन अवैध चुनखडीचे उत्खनन करीत होते,
मोठ्या प्रमाणात वन जमीनीची नुकसान केले, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी केली, प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी नाही,औद्योगिक अकृषिक कर करोडो रुपयांचे ४५वर्षापासुन नुकसान केले,हे सर्व मुद्दे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे विनोद खोब्रागडे यांच्या जेष्ठ वकील मंडळी यांनी पुराव्यानिशी कोर्टाचा निदर्शनास आणून दिले
न्यायमूर्ती यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन दिनांक ९/२/२०२६ पर्यंत उत्तर मागितले आहे
४५ वर्षानंतर कुंसूबीचा २४आदीवासीना शेतजमीचा व घरांचा मोबदला देण्यासाठी कंपनीचे पदाधिकारी कुंसूबी गावात जाऊन २४आदीवासीनां न्याय व हक्क देण्यासाठी बैठकी वर बैठक घेणे सुरू आहे

कुंसूबीचा २४आदीवासीना न्याय व हक्क देण्यासाठी या पुर्वी सुद्धा मा. अपर विभागीय आयुक्त नागपूर यांनी आदेश दिले होते, त्यांच्या आदेशानुसार मा.अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मानीकगढ सिमेंट कंपनी व अल्टाटेक सिमेंट कंपनी समंधात मा.जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर, मा.भुसंपादन उप जिल्हाधिकारी चंद्रपूर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, क्षेत्र अधिकारी वन विभाग मध्य चांदा,मा उपविभागीय अधिकारी राजुरा, व मा.तहसिलदार जिवती यांना आदेश देऊन स्पष्ट निर्देश
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी विनोद खोब्रागडे पटवारी तथा सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी क्रिमीनल रिट पीटीशन दाखल केले, त्यामध्ये सदर प्रकरण कोर्टाने गांभीर्याने घेतल्या नंतर कंपनी खडबडून जागी झाली
४५ वर्षानंतर मे.मानीकगढ सिमेंट कंपनी व अल्टाटेक सिमेंट कंपनी महसूल अधिकारी यांना कुठलीही पुर्व सुचना न देता कुंसूबीचा २४आदीवासी सोबत बैठक घेऊन शेतीचा मोबदला व घरांचा मोबदला देऊ असे लिखीत दिले आहे
४५वर्षापासुन कुंसूबीचा २४ आदीवासीवर अन्याय अत्याचार कंपनी करीत असताना, जे काम मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, महसूल अधिकारी व पोलिस अधिकारी करु शकली नाही ते काम एक सामान्य पटवारी तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी करुन दाखवले आहे

आता लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मौजा बरांज मोकासा येथील मे कर्नाटक एम्टा कोलमाईन्स लिमिटेड कंपनी बेंगलोर व में कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनी बेंगलोर व मौजा बेलोरा येथील मे अरबिंदो कंपनी विरुद्ध सुद्धा नियमबाह्य व बेकायदेशीर, कुठलेही आदेश नसताना एका दिवसात फेरफार घेऊन त्याचं दिवशी फेरफार मंजूर केले व अवैध कोळशाचे उत्खनन करीत असल्यामुळे त्यांच्या वर सुद्धा एक दोन दिवसात कारवाई होणार आहे
एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही

जनहीतार्थ जारी
लोकशाही बळकट करण्यासाठी, भारतीय संविधानाचे संरक्षण करण्यासाठी, समाजहितासाठी,देशहीतासाठी, राष्ट्रहीतासाठी सर्व समाज बांधवांनी जागृत राहावे धन्यवाद
अपीलार्थी
विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा लोकसेवक पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा जनप्रतिनिधी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१




