वाढदिवसा निर्मित्य रूग्णांना फळवाटप कुमुदिनी भोयर महिला पत्रकार यांचा रूग्णांसोबत वाढदिवस साजरा ????????????

15

 

मूल शहरातील कुमुदिनी भोयर प्रेस क्लबच्या सचिव, मुल तालुक्यातील प्रथम महिला पत्रकार, गायिका यांच्या वाढदिवसा निर्मित्य 6 मे 2024 ला शहरातील मिडीया पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व मित्र मंडळींनी मूल शहरातील उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप केले.
कुमुदिनी समाजात समाजसेवी महिला पत्रकार, गायिका,मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या कुमुदिनी यांचे शहर,ग्रामीण ,गोरगरीब जनतेच्या खाजगी,शासकीय कोणत्याही कामाकरिता सदैव धावून जाणारी म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनेकांनी भावी नगरसेविका असा उल्लेख करीत कुमुदिनीला शुभेच्छा दिल्या. कुमुदिनी भोयरला वाढदिवसा निमित्य शहरासह,तालुक्यातील परिसरातून शुभेच्छाचे वर्षाव झाले. रूग्णालयात फळ वाटप करते वेळी उपजिल्हारूग्णालय अधीक्षक, तथा सामाजिक कार्यकर्ते, विजय सिद्धावार, विवेक मुत्यालवार,संदीप मोहब्बे, निलेश रायकंटीवार,बब्लू सय्यद,सतीश राजूरवार, राकेश मोहुर्ले,धर्मेन्द्र सूत्रपवार, प्रफुल येरचलवार, नयन कोलप्याकवार साहिल भोयर, नागरीक व बहूसंख्या युवक उपस्थित होते.