महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी पदी सौ.अपर्णाताई चिडे

44

 

*सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव*

दीपक कटकोजवार /चंद्रपूर

नुकत्याच पार पडलेल्या महिला पतंजली योग समिती व मुक्ती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जैन भवन मधील शेकडो महिला भगिनींनींची उपस्थिती असलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात महिला पतंजली पुर्व महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षा सौ.शोभा भागीया यांनी नव्याने महिला पतंजली योग समितीच्या चंद्रपूर जिल्हा प्रभारी पदी सौ.अपर्णाताई प्रविण चिडे यांची निवड करुन त्यांचेकडे पदभार ही सोपविलेला आहे याप्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सुविद्य पत्नी,कार्यक्रमाच्या उद्घघाटीका सौ.सपनाताई सुधीर मुनगंटीवार, सुप्रसिद्ध डॉ.सौ.प्रेरणा कोलते, महाराष्ट्र महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या सौ.स्मिता रेभनकर, मुक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.मंजुश्री सुभाष कासनगोट्टूवार, सोनिया जडेजा,सौ. छबु वैरागडे,सौ.गायत्री कोतपल्लीवार आदी मान्यवर महिला भगिनींची मंचावर उपस्थिती होती. महिला भगिनींनी साठी पतंजली साडी किंवा लाल(पिंक) साडी अशा प्रकारचा ड्रेस कोड ठेवण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणाद्वारे नसरीन शेख यांनी महिला पतंजली समितीच्या कार्याची माहिती विषद केली तर संचालन आशा दुधपचारे व आभारप्रदर्शन सौ.सविता मसराम यांनी केले. चंद्रपूर जिल्हा महिला पतंजली योग समितीच्या प्रभारी पदी निवड होवुन पदभार स्वीकारल्या बद्दल सौ.अपर्णाताई चिडे यांचे उपस्थित वरिष्ठ अतिथीसह इंद्रायणी सैनी,जया धारणकर,सुमन वराटे, आशा देवाळकर,झरणा सरकार,ज्योती मसराम,वंदना भुषनवार, शारदा डाखोरे,स्मिता श्रीगडीवार, मनिषा गौरकार, लता चाफले, रेणुका साटोने, कामिनी वैरागडे,ज्योती कुंभारे, माधुरी बोडेकर, चितवन चव्हाण, निता नागपुरे, कविता सावरकर,विमल काटकर,वैशाली रामेडवार,यांचेसह जिल्हाभरातुन आलेल्या योग शिक्षिका,योग साधक, साधीका आदिंनी सौ.चिडे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करीत शुभेच्छा दिल्या.