दोन वर्षांपूर्वी ऍड.अस्मिता मुंगल यांच्या मार्फत जिल्हा तक्रार निवारण आयोग वर्धा यांच्या कडे दाखल केलेल्या तक्रारीचा आज आदेश ऍड अस्मिता मुंगल यांच्या बाजूने पारित झाला. तक्रार कर्त्याची म्हैस विद्युत पोल ला करंट असल्यामुळे मरण पावली.विद्युत वितरण कंपनीने नुकसान भरपाई म्हणून फक्त तीस हजार मंजूर केले होते.या कारणाने व्यथित होऊन तक्रार कर्त्याने ऍड.अस्मिता मार्फत जिल्हा तक्रार निवारण आयोग वर्धा येथे तक्रार दाखल केली. अखेरीस जिल्हा तक्रार निवारण आयोगाने तक्रार कर्त्याला 80000 रुपये व केस दाखल केली त्या तारखेपासून तक्रार कर्त्यास रक्कम प्राप्त होईपर्यंत द. सा. द.शे. 9 टक्के दराने व्याज व शारीरिक ,मानसिक त्रासापोटी 15000 रुपये व तक्रारीचा खर्च 5000 रुपये देण्याचा आदेश पारित झाला. तक्रार कत्याला असे एकूण एक लाख पंधरा ते वीस हजार मिळेल .
ऍड. अस्मिता च्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन??
व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा ??