एड. अस्मिता मुंगल (खानेकर) यांची सफल पैरवी

40


*वीज वितरण कंपनीला ग्राहक आयोगाची चपराक*

हिंगणघाट- जिल्हा तक्रार निवारण आयोग, वर्धा यांनी तक्रारदार संजय उत्तमराव सावंकार ला रु. 80 हजार 09 प्रतिशत द.सा.द.शे. व्याज, मानसिक त्रासापोटी रु. 15 हजार आणि तक्रारीचा खर्च रु. 5 हजार देण्याचे आदेश वीज वितरण कंपनी विरुद्ध दिले.
विस्तृत माहितीनुसार समिपस्थ सावंगी (हेटी येथील निवासी संजय उत्तमराव सावंकार यांची पालतू आणि दुधारू म्हैस दि.15.01.2023 ला सांवगी हेटी येथे विद्युत पोलला करंट असल्यामुळे मरण पावली. विद्युत वितरण कंपनीची चूक असल्याने त्यांचे कडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. परंतु कंपनीने नुकसान भरपाई म्हणून फक्त 30 हजार मंजूर केले होते. या कारणाने व्यथित होऊन तक्रारकर्त्याने एड. अस्मिता मुंगल (खानेकर) यांचे मार्फत जिल्हा तक्रार निवारण आयोग, वर्धा येथे तक्रार दाखल केली. एड. खानेकर यांनी तक्रारदाराची भक्कमपणे बाजू मांडळी आणि पुरजोर अपील केली.
उभय पक्षांची सुनावणी, पुरावे आणि युक्तिवाद पाहिल्या व ऐकल्यानंतर जिल्हा तक्रार निवारण आयोगाने तक्रारकर्ताचे अर्ज मंजूर करत नुकसान भरपाई म्हणून रु. 80 हजार व प्रकरण दाखल केले त्या तारखे पासून तक्रारकर्त्यास रक्कम प्राप्त होई पर्यंत द. सा. द. शे. 09 टक्के दराने व्याज व शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 15 हजार व तक्रारीचा खर्च रु. 5 हजार देण्याचे आदेश पारित केले. तक्रारकत्याला असे एकूण एक लाख पंधरा ते वीस हजार रु. मिळणार आहे.
एका होतकरू शेतकरीची व्यथा ग्राहक आयोग पर्यंत पोहोचवून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी झटपट करणारी महिला अधिवक्ता एड. अस्मिता मुंगल (खानेकर) यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे पुढील सफल वाटचालीसाठी एड. इब्राहीम हबीब बख्श, एड. सारिका चव्हाण दाभाडे, एड. अश्विनी तपासे, एड. राहत पटेल, एड. सिमरन थडानी, सना मोहम्मद कय्युम, कुशल सरकार, चेतन ठाकरे सह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.