बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे गणराज्य दिन साजरा.

31

 

मूल येथील शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे गणराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव ऍड अनिल वैरागडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच मुख्य अतिथी म्हणून पंकज अहीर सर न्यायाधीश न्यायदंडाधिकारी, दिवाणी व फौजदारी न्यायालय मुल ,विशेष अतिथी म्हणून डॉ. आगलावे सर, प्राध्यापक कर्मवीर महाविद्यालय, मुल व शाळेचे प्राचार्य विनोद सर बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल तसेच अतिथी म्हणून कुमार गीतेश गांवतुरे विद्यार्थी प्रतिनिधी बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल आणि कुमारी उत्कर्षां वाळके विद्यार्थिनी प्रतिनिधी बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल कार्यक्रमात उपस्थित होते प्राचार्य सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तसेच सर्व मान्यवारांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थांनी दिनाचे औचित्य साधून वेगवेगळे नृत्य व क्रीडा नृत्य व तिरंगा ध्वज ला मानवंदना देण्यासाठी परेड चे प्रदर्शन करण्यात आले. आणि विद्यार्थांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याकरिता विद्यार्थना पारितोषिक, मेडल, व प्रमाणपत्र देण्यात आले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं तोषी जयस्वाल सांस्कृतिक प्रभारी बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल तसेच कुमार अंश तेलसे वर्ग 9 वा व कशिश रामटेके इयत्ता 9वी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. दुर्गा कोटगले यानी केले व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगानाने झाली.