शूरवी महिला महाविद्यालय मूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला

42

दिनांक 26 जानेवारी 2024 भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिवस शूरवी महिला महाविद्यालय मुल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या विशेष अतिथी सौ.सपनाताई सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारत मातेच्या प्रतिमेचे तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प माला अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री माता कन्यका सेवा संस्थेचे सचिव श्री राजेश्वर सुरावार होते तर प्रमुख उपस्थितीती महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या हर्षा खरासे , मा.अनिल दंडमवार, मा.दिलीप नेरलवार मान.जस्सुजी सिंघवी, मा.अजय गोगुलवार, मा.जीवन कोंतमवार, सौ.सोनाली कोल्पॅकवार सौ.अमृता तुंगुडवार, सौ.शिल्पा चिल्लरवार होते. कार्यक्रमाच्या विशेष अथिती सौ.सपनाताई सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थीनिमध्ये देशप्रेम राष्ट्राभिमान निर्माण व्हावा यासाठी विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेश्वर सुरावार यांनी देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री सुदेश कापर्तीवार सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थीनींना , प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थीनींनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हर्षा खरासे प्राचार्या( प्र.) यांनी केले व सूत्रसंचालन प्रा.डॉ.मीनाक्षी राईंचवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. आशिष आष्टनकर यांनी मानले.