मूल :- शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालीत बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे आनंद मेला फॅमिली फंडे व नववर्षाचे स्वागत या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल वैरागडे सचिव शिक्षण प्रसारक मंडळ मूल तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून सौं वर्षा पिपरे मॅडम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुल तसेच शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवर सर व प्रमुख पाहुणे म्हणून श्री भास्कर अवताडे सर आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला व पालकांसाठी विविध प्रकारच्या खेळाची स्पर्धा घेण्यात आली तसेच नृत्य स्पर्धा व गीत गायन स्पर्धा घेण्यात आली तसेच शाळेचे प्राचार्य श्री विनोद बोलीवार सर आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना तसेच पालकांना खेळाडूवृत्ती निर्माण करून विविध स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आपल्या भाषणातून सांगण्यात आले तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून सौ वर्षा पिपरी मॅडम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुल यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य तसे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच क्रीडा शिक्षक स्वप्निल नवघरे यांनी खेळाबद्दल ची माहिती पालकांना सांगण्यात आले आणि स्पर्धा घेण्यासाठी सहकार्य केले तसेच सर्व शिक्षक शिक्षकांनी स्पर्धेमध्ये सहभागी पालक विद्यार्थी यांचे परीक्षण केले तसेच स्वागत गीत शाळेतील शिक्षिका यांनी सादर केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सौं तोषी जयस्वाल व दुर्गा कोटगले व रुहीना सय्यद यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.दर्शना शेलेकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली.
Home Breaking News बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे आनंदमेला, फॅमिली फंडे, व नववर्षाचे स्वागत मोठया...