अपहरण, बलात्कार व पोक्सोच्या आरोपातून विकेश गेडाम निर्दोष मुक्त

36

हिंगणघाट :- अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून वारंवार शारीरिक संबंध बनवून बलात्कार केल्याचे आरोप असलेल्या प्रकरणात स्थानिक जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-1 यांनी विकेश उर्फ विक्की गेडाम याला निर्दोष बरी करण्याचे आदेश दिले.
फिर्यादीची तक्रारीनुसार, आरोपी विकेशने फिर्यादीची अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून वारंवार शारीरिक संबंध बनवून बलात्कार केल्याची तक्रार पोलीस स्टेशन वडनेर येथे केली. तिच्या तक्रारीवरून वडनेर पोलिसांनी भा.दं.सं. ची कलम 363, 366, 376 आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम-2012 ची कलम 4 व 8 अन्वये अपराध क्र. 29/2014 आरोपी विकेश विरुद्ध नोंदविला.
सदर प्रकरणात पोलिसांनी तपास केला आणि त्यांना सबळ पुरावा मिळून आल्याने त्यांनी प्रकरण न्याय प्रविष्ठ केले. आरोपीने अपराध इन्कार केला, त्यामुळे कोर्टात प्रकरण शुरू झाला. अभियोजन पक्षाने एकूण 14 साक्षदार तपासले. तसेच आरोपीने डॉन साक्षदार तपासले.
अभियोजन पक्षाने सर्व साक्ष-पुरावे पेश केले. आरोपीचे पक्ष एड. इब्राहीम हबीब बख्श यांनी मांडले. एड. बख्श यांनी तक्रार आणि आरोप पत्रातील अनेक त्रुटी व साक्षदरांचे बयाणातील तफावत कोर्टासमोर मांडली आणि म्हणाले कि, सदर रिपोर्ट खोटी आहे. दोन्ही पक्षांचे साक्ष-पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्वान न्यायाधीशांनी आरोपी विकेश उर्फ विक्की गेडाम याला भा.दं.सं. ची कलम 363, 366, 376 आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम-2012 ची कलम 4 व 8 अन्वये अपराध क्र. 29/2014 या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. आरोपीची पैरवी एड. इब्राहीम हबीब बख्श यांनी केली व त्यांना एड. राहत सादिक पटेल, एड. अश्विनी प्रकाश तपासे व एड. अस्मिता अरविंद मुंगल यांनी सहकार्य केले.