जयंती दिनानिमित्य रात्रपाळी महाविद्यालयात डॉ.स्व.सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांना भावपूर्ण अभिवादन 💐💐💐

39

*( श्री दीपक कटकोजवार चंद्रपुर यांच्याकडुन साभार प्राप्त )*
चंद्रपूर शहरातील वडगांव परीसरात लोकमान्य टिळक ज्ञान मंदिराच्या वरील मजल्यावर असलेल्या सुसज्ज इमारतीत यावर्षी प्रथमच श्री.कन्यका शिक्षण संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या डॉ.स्व.सच्चिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालयात डॉ.स्व.सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या जयंती निमित्ताने दि.९ ऑक्टोबर ला त्यांच्या प्रतिमेला बल्लारपूर येथील एस.एन.डी.टी महिला विद्यापिठाचे केंद्र संचालक व माजी प्राचार्य डॉ.राजेश इंगोले सर व श्री.माता कन्यका सेवा संस्थेचे सचिव मा.राजेश्वर सुरावार यांनी मालार्पण करुन भावपूर्ण अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे, सहा.प्राध्यापकद्वय श्रीकांत साव,अजित जुल्फे, सर्व सहाय्यक प्राध्यापिका माधुरी कटकोजवार,स्विनल रामटेके, दिपाली दांडेकर,स्मिता काळे, स्नेहा तिवारी,स्मिता नंदनवार,आणी शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.