मुल शहराचे क्रिडा क्षेत्राकडे कल

55

*चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका म्हणून ओळखला जाणारा एक छोटासा गाव हळूहळू आज मोठी प्रगती करीत एक शहरी तालुका म्हणून ओळखला जात आहे, तसेच क्रिडा क्षेत्रातही मुल शहराचे चांगलेच नाव गाजत आहे मग ते कुस्ती असो की कबड्डी, सिकई मार्शल आर्ट्स, कराटे अशा विविध खेळा द्वारे मुल शहर क्रिडा क्षेत्रात फार कमाई करत असल्याचे दिसून येत आहे .* * *याच प्रकारे या वर्षी चालू असलेल्या शालेय क्रिडा स्पर्धेत मुल मधील शालेय विद्यार्थ्यांनी दिनांक 07/09/2023 गुरुवार ला जिल्हा स्तरीय शालेय वेटलिफ्टिंग या स्पर्धेत प्रथमच वर्षात बाजी मारत मोठा विजय मिळविला आहे*
* त्यात मुल च्या दहा खेळाडूंना यश आले असून आता हे सर्व विजयी खेळाडू विभागीय स्तरावर मुल शहरातून चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार.*
* या सर्व खेळाडुंनि दोन महिने सराव करीत मोठा विजय प्राप्त केला असून ते मुल तालुका क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय खेळाडू करण कोसरे यांच्या कडे प्रशिक्षण घेत आहे प्रशिक्षकांचे म्हणणे आहे की जर या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी सोयिस्कर जागा व पुरेसा साहित्य मिळाल्यास हे खेळाडू नक्कीच प्रथमच वर्षात राज्य स्तरावर मोठा विजय प्राप्त करणार.*