असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत चिमढा येथे करण्यात आला काँग्रेस च्या जनसंवाद यात्रेचा समारोप

24

मुल :-
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ मुल येथील गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागविदर्भ चारखासंघ पुण्यभूमीतून काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.*
*लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयातत्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, लोकशाहीची हत्या संबंधित मुद्यावर मुल तालुक्यातील समस्त गावे पिंजून काढून राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांनी दिलेला संदेश प्रत्येक गावात प्रत्येक घरा – घरात चर्चेद्वारे पोहचविण्यात आला.* * *जनसंवाद यात्रेचा समारोप आकापुर, टेकाडी चीमढा गावातून कांग्रेस नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांचे नेतृत्वात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत भव्य जनसंवाद रॅली काढून ग्रा.पं.सरपंच कालिदास खोब्रागडे यांचे अध्यक्षतेखाली चिमढा गावात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे पुतळ्यासमोर करण्यात आला.* *समारोपीय कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,माजी सभापती व संचालक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर,उपसभापती राजेंद्र कन्नमवार,विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष संदीप कारमवार, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण नेते दीपक वाढई, सेवादलाचे जेष्ठ नेते नामदेवराव गावतूरे, उपस्थित होते .*
*समारोपीय कार्यक्रम निमित्त तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी जनसंवाद यात्रेबाबत राहुलजी गांधी यांचा संदेश आपल्या संवादातून सविस्तरपणे समजाऊन सांगितला.तर ओबीसी कांग्रेस सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनीही केंद्र व राज्य सरकार जनतेची पिळवणूक कशी करीत आहे.शिक्षण सुद्धा विकत असल्याने तुम्ही आतातरी जागृत होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.*
*समारोपीय कार्यक्रमाचे आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी केले. * *या यात्रेतव समारोपीय कार्यक्रमाला युवक अध्यक्ष पवन नीलमवार,युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार,
एन. टी.सेल अध्यक्ष गणेश गेडाम, महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार,सचिव शामला बेलसरे,कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार,सदस्य सीमा भसारकर समता बनसोड, विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष अरविंद बोरुले, उपसरपंच साहिल येंनगंटीवार, योगेश लेंनगूरे,साजिद शेख, गंगाधर घुगरे, ईश्वर लोनबले चिमढा ग्रा. पं.सर्व सदस्य, व असंख्य महिला पुरुष,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*