कराटे अँड फिटनेस क्लब मूल मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आले

36

*५ सप्टेंबर हा दिवस पूर्व राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त भारतात शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात येतो मूल मधील कराटे अँड फिटनेस क्लब मध्ये विद्यार्थ्यांनी मिळून हा दिन साजरा केला .ज्यात विद्यार्थ्यांनी आज प्रशिक्षकांची भूमिका बजावत प्रशिक्षण दिले.मुख्य प्रशिक्षक इम्रान खान आणि निलेश गेडाम ह्यांच्या हस्ते केक कापून शिक्षकदिन कार्यक्रमाला सुरुवात केली,विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर केले.ज्यात त्यांनी प्रशिक्षकांना शुभेच्छा देत शिक्षक दिन आणि त्यांच्या आयुष्यातील शिक्षकांबद्दल आपला आदरभाव व्यक्त केला.*
*”कराटे अँड फिटनेस क्लब हे मूल मध्ये मागच्या 17-18 वर्षपासून खेळाडू घडवीत आहे.माती पासून सुरू करत आज आधुनिक साधन सुविधा पर्यंत प्रशिक्षकांनी हा प्रवास पाहिला आहे.असे परिपूर्ण क्लब जवळपास कुठेही नाही, हे सगळं पुरविता आले कारण आम्ही खेळाडू रूपातुन आमचे स्वप्न प्रशिक्षक होऊन तुम्हा विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून बघतो,आणि ते पूर्णही होत आहेत.*
*आपल्या मूल शहराला उत्तम दर्जाचे राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय कराटे खेळाडू देणे हे आमचे लक्ष्य होते आणि आहे ज्याच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू घडत आहेत आणि आपला क्लब,शहर आणि पालकांचे नावलौकिक करत आहेत, यात तुम्ही सर्व विद्यार्थी आणि पालकांचा मनातून जो सहभाग आहे त्यामुळेच आम्हाला या क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून समाधान वाटते” असे प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक इम्रान खान यांनी व्यक्त केले.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आल्हाद भोयर आणि दिव्या नरड ने केले तर संपूर्ण व्यवस्था सहप्रशिक्षक साक्षी गुरनुले आणि सिनिअर विद्यार्थी नैतिक धोबे,दिव्या नरड, मित खोब्रागडे, प्रीती भंडारी,धरती भोयर,प्रणाली झरकर आणि श्रेया झाडे यांनी केली.*
*या संपूर्ण आयोजनासाठी प्रशिक्षक निलेश गेडाम यांनी सर्व विद्यार्थ्यांना आभार व्यक्त केले आहे.*