आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने अरविंद मुंगल सन्मानीत

27

*हिंगणघाट -* स्थानिक काचनगांव येथील जि. प उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक अरविंद मुंगल यांना नुकतेच हिंगणघाट येथे जस्टिस अरुण चौधरी, सेवानिवृत्त न्यायमूर्ति पंजाब हरियाणा उच्च न्यायालय, आमदार समीर कुनावार यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने’ सपत्नीक सन्मानित करण्यात आले. त्यांची अर्धांगिनी एड. अस्मिता मुंगल हया सुध्दा समाज सेविका आहेत. अरविंद मुंगल हे खरोखर आदर्श शिक्षकच आहे. ते सन 1999 मध्ये शिक्षक पदावर नियुक्त झाले. तेव्हा पासुन आज पर्यंत ते सतत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित आणि जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा देतात. *
*स्थानिक केजीएन मंगल कार्यालय येथे किड्स ब्राइट फ्यूचर स्पोर्ट क्लब द्वारे आयोजित शिक्षक सम्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता.*
*यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ उद्योगपति मोहनबाबू अग्रवाल, समाजसेवी इमरान राही, पूर्व कार्यकारी अभियंता के. आर. बजाज, सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त चंद्रकांत उदगीरकर, जमील अहमद, एड. इब्राहिम बख्श आदी उपस्थित होते.*
*समारंभाची प्रस्तावना अब्दुल कदीर बख्श यांनी केली आणि आभार अनिकेत भैसारे यानी मानले . अरविंद मंगल यांना पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.*