बॅरि .राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त रिप. (खोरिपा)चे राज्यस्तरीय अधिवेशन ब्रह्मपूरी येथे होणार

48

 

( श्री माणिकराव तुरे द्वारा साभार प्राप्त )
:नुकतीच नागपूर येथे रिपब्लिकन पक्ष ( खोरिपा) केंद्रीय कार्यकारिणी तसेच राज्य कार्यकारिणीची एकत्रितपणे बैठक आयोजित करण्यात आली होती रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेन्द्र शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस व राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत नेते बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन ब्रह्मपूरी येथे आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली व रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)ची वाटचाल देशातील हुकुमशाही विरोधात लोकशाही संविधान वाचविण्यासाठी असेल अशी भूमिका सविस्तर चर्चा केल्यानंतर घेण्यात आली ह्या वेळी विदर्भ प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी आयुष्मती संघमित्रा खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची तसेच नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष पदी प्रकाश तारु यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेन्द्र शेंडे यांनी केली नागपूर येथील आमदार निवासातील सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा देशक गिरीशबाबू खोब्रागडे, उपाध्यक्ष प्रा डॉ गोपीचंद मेश्राम, संघटन सचिव मा उत्तमराव गवई, प्रवक्ते मा डॉ एन व्हि ढोके, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे, कार्याध्यक्ष डॉ देवेश कांबळे, उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख, उपाध्यक्ष सी एम रामटेके, सरचिटणीस जीवन बागडे, चिटणीस प्रा अशोक ढोले, विदर्भ प्रदेश अध्यक्ष सी पी रामटेके, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रशिक आनंद, भिमराव चौरे, मुन्नाभाऊ खोब्रागडे,रवि पाटील, संघमित्रा खोब्रागडे,प्रकाश तारु आदी मान्यवर उपस्थित होते.अशी माहिती माणिकराव तुरे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश खोरीपा यांनी दिली.