धनादेश अनादर प्रकरण मध्ये शिल्पाला 09 महिन्याची शिक्षा आणि रु. 2 लाखचा दंड

36

 

*( श्री राहुल हीराचंद टेंभूर्ने, हिंगनघाट यांच्याकडून साभार प्राप्त )*

हिंगणघाट:- धनादेश अनादर प्रकरणात स्थानीय 3 रे न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी श्री देशपांडे साहेब यांनी स्थानिक निवासी आरोपी सौ. शिल्पा शैलेष पंपनवार हीला 09 महिन्याचा कारावास व रु. 2,07,940/- चा दंड आणि दंड न भरल्यास 04 महिन्याची अतिरिक्त अशी शिक्षा सुनावली.
विस्तृत माहितीनुसार हिंगनघाट निवासी श्री राहुल हिराचंद टेंभूर्ने यांची ड्रायविंग स्कूल आहे. तसेच त्यांचे कडे उसाचे रस काढण्याची मशीन आणि मोटार होती. सदर मशीन आणि मोटार खरेदी करण्याचा सौदा आरोपी शिल्पा हिने केला आणि त्याचे भुगतान करिता देना बैंक, हिंगणघाट शाखाचा रु. 1,48,000/- चा धनादेश दिला.
जेव्हा फिर्यादीने सदर धनादेश आपल्या खात्यामध्ये जमा केला तेव्हा आरोपीच्या बैंकेने आरोपीच्या खात्यात अपुरी रक्कम असल्याचे कारणावरून तो धनादेश न वटविता परत करून दिला.*
*या नंतर फिर्यादी राहुल यांनी त्यांचे अधिवक्ता इब्राहीम हबीब बख्श यांच्या माध्यमाने आरोपी शिल्पा पंपनवार हीला नोटिस पाठवून आपली बकाया रक्कमची मागणी केली. परंतु आरोपीने रक्कम दिली नाही.* *अंततः फिर्यादी राहुल यांनी हिंगणघाट न्यायालयात निगोशिएबल इंस्ट्रूमेंट ची कलम 138 अन्वये फिर्याद दाखल केली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद व साक्ष-पुरावे पाहून विद्वान न्यायाधीश श्री देशपांडे यांनी आरोपी शिल्पा शैलेष पंपनवार हीला धनादेश अनादर प्रकरणात दोषी ठरवून तिले 09 महिन्याचा कारावास व रु. 2,07,940/- दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त 04 महिन्याचा कारावास अशी शिक्षा आरोपीस दिली. फिर्यादी राहुल टेंभूर्ने यांच्या वतीने एड. इब्राहीम हबीब बख्श यांनी न्यायालयात बाजू मांडली.*