*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) यांची पूर्व विदर्भ आढावा बैठक शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट ला विश्राम गृह चंद्रपूर येथे पार पडली .*
*या आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश्याध्याक्ष मा. भानुदास जी माळी , प्रकाश पाटील मारकवार (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर), मा. गोविंद भंडारकर, धनराज मुंगळे,उमाकांत धांडे, दीपक वाढई, प्रा.नरेंद्र बोबडे,गुरुदास चौधरी,नंदकिशोर वाढाई, प्रशांत दानव, राहुल चौधरी, राहुल ताजने,विवेक कुळमेथे आणि अजिंक्य प्रकाश पाटील (उपाध्यक्ष- जिल्हा कॉंग्रेस कमिटी ,ओबीसी विभाग,चंद्रपूर) हे उपस्थित होते.*
* प्रकाश पाटील बैठकीत ओबीसी आरक्षण , वसतिगृह, ओबीसी योजना या बद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन केले आणि ते पूर्ण होण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे असे सांगितले त्यासाठी सर्व ओबीसी बांधव एकत्र येऊन लढा देण्याची तयारी करावी असे आवाहन त्यांनी केले.*
Home Breaking News महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) यांची पूर्व विदर्भ आढावा बैठक दिनांक...