राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आरोग्य तपासणी शिबिर मध्ये हजारो गरजूंनी घेतला लाभ

38

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आली शिबिर*

*कारंजा _ जिला वाशिम (असलम मामदानी)*

*स्थानिक रॉयल पॅलेस येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत रोग निदान व डोळे, दंत तपासणी सह आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाशीम जिल्हाध्यक्ष मो.युसुफ पुंजानी यांनी केले होते.*

*या शिबिराला उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाशीम जिल्हाध्यक्ष मो.युसुफ पुंजानी हे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, युवा नेते देवव्रत डहाके, राकॉपा अमरावती जिल्हा पक्षनिरीक्षक सोनालीताई ठाकूर, राकॉपा यवतमाळ जिल्हा पक्षनिरीक्षक अशोकभाऊ परळीकर, माजी नगराध्यक्ष चंदू परळीकर, माजी जिल्हा परिषद सभापती जयकिसन राठोड, जिल्हा परिषद सभापती अशोक डोंगरदिवे, व्यापारी असोसएशनचे अध्यक्ष गोविंद वर्मा, पंचायत समिती सभापती प्रदीप देशमुख, डॉ. अजय कांत, डॉ. शार्दुल डोणगावकर, डॉ.आसिफ अकबानी, डॉ. सय्यद तौसिफ उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. साळुंके, डॉ. जगदिश वानखडे, डॉ. रागेब खान, डॉ. अजमल खान, डॉ. एजाज खान, डॉ. मुज्जमिल , डॉ. मोहसीन खान, डॉ. सोहेल कादरी, डॉ. रेहान पोपटे, डॉ.नवेद अख्तर डॉ. सय्यद फैजान, डॉ. मुकुल तेलगोटे , डॉ. विजय जवाहरमलानी, डॉ. विक्की वानखडे, डॉ. शकील मिर्झा, डॉ. शोयब खान, डॉ. वसीम घानीवाला, माजी नगराध्यक्ष संजय काकडे, मिर आशिक अली, निळूभाऊ गजभिये, खेमसिंग चव्हाण, रॉयल पॅलेसचे संचालक फारुक पोपटे आदींची उपस्थिती होती.* *दरम्यान शिबिर मध्ये रक्तक्षय, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, दंत तपासणी, अशा विविध तपासण्याचा समावेश होता.*
*शिबिरात उपचाराबरोबरच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. व डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिर मध्ये उपजिल्हा रुग्णालय कारंजा तसेच कारंजा डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी दिवसभर रुग्णांना मोफत सेवा दिली. शिबिराला यशस्वी करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचा प्रास्ताविक हमीद शेख तर संचालन ॲड. फिरोज शेकुवाले यांनी केले तर आभार जाकीर शेख यांनी मानले.*