*कला आणि संस्कृती क्षेत्रात संगीताचे मोलाचे स्थान आहे. मूल तालुक्यात संगीत क्षेत्राच्या सोयी उपलब्ध नसतांना सुध्दा गाण्याच्या विशेष आवड़ आणि छंदा मुळे प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर जिद्दी आणि चिकाटीने कुमुदिनी भोयर ने संगीत विषयात बी. ए ( विशारद) एफ.ई. एस गर्ल्स कॉलेज येथे पूर्ण करुन एम. ए. ( अलंकार ) प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण केली.* *कु. कुमुदिनी शरद भोयर ही वसंतराव नाईक संगीत महाविद्यालय नागपुर (माँरीयस) येथे भारतीय संगीत एम. ए.चे शिक्षण पूर्ण केले.*
*तिचे अष्टपैलु व्यक्तिमत्व असून मूल तालुक्यातील पहिली महिला पत्रकार म्हणून कुमुदिनी ने ख्याती व सन्मान मिळविला आहे.*
*अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम कुमुदिनी नेहमीच करत असते. स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांवर स्त्रीशक्ती ग्रुपच्या माध्यमातून मुल तालुक्यातील महिलांना तिने एकत्र जोडले आहेत.* *समाजसेवी गायिका तसेच पत्रकार अशी तिची ओळख बनली आहे. तिच्या सेवाभावि कार्यामुळेविविध संगठना द्वारे बऱ्याचदा तिचे सत्कार करण्यात आले आहे. कुमुदिनी ने वयाच्या 18 व्या वर्षात मूल येथे स्व:ताचा स्वर मधुर नावाचा संगीत कार्यक्रम यशस्वी केला.*
*आता भारतीय संगीतात एम ए पूर्ण केले असल्याने तिच्या या यशाला शिक्षण, सामाजिक, साहित्य सर्व क्षेत्रातून आणि मित्र, परिवार कडून शुभेच्छांचा तिच्यावर वर्षाव होत आहे. कुमुदिनीने याचे श्रेय…. आई तसेच प्रफुल मेश्राम, गणेश गायकवाड, भालचंद्र धाबेकर, चिदानंद चिडाम, बनसोड सर, वसंतराव नाईक कॉलेजमधील सुजाता व्यास मॅडम, साधना शिलेदार मॅडम, बुद्धा लिहितकर सर यांना दिले आहे.*