हिंगणघाट :- धनादेश अनादर प्रकरणात स्थानिक 2 रे न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी श्री पवार साहब यांनी हिंगणघाट निवासी आरोपी रशीद खान पठाणला निर्दोष बरी करण्याचे आदेश दिले.

28

फिर्यादी हिंगणघाट नागरी सहकारी पत संस्था च्या तक्रारीनुसार, हिंगनघाट निवासी रशीद खान पठाण यांनी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करिता आरोपीने संस्थेस रु. 70,000/- चा धनादेश दिला होता. आरोपीच्या खात्यात पर्याप्त राशी नसल्याने से सदर धनादेश बाउंस झाला. संस्थेने नियमानुसार नोटीस पाठवून धनादेशाची रक्कम मागितली. परंतु आरोपीने नोटीस प्राप्त करून सुद्धा धनादेशाची रक्कम परत केली नाही, म्हणून संस्थेने आरोपीविरुद्ध निगोशिएबल इंस्ट्रूमेंट ची कलम 138 अन्वये न्यायालयात प्रकरण दाखल केले.
संस्थेने सर्व साक्ष-पुरावे पेश केले. आरोपीचे पक्ष एड. इब्राहीम हबीब बख्श यांनी आरोपीची बाजू मांडली. दोन्ही पक्षांचे साक्ष-पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्वान न्यायाधीश श्री पवार साहेब यांनी आरोपी रशीद खान पठाण यांना धनादेश अनादर प्रकरणात निर्दोष करार दिले आणि त्याला बरी करण्याचे आदेश दिले. आरोपीची पैरवी एड. इब्राहीम हबीब बख्श यांनी केली.*
दि. 12/07/2023
हिंगणघाट
एड. इब्राहीम हबीब बख्श,
हिंगनघाट