काँग्रेसचे नेते तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ मुल पूर्ण बंद

51

*११/०५/२०२३च्या रात्री ९-२० च्या दरम्यान केलेल्या संतोषसींह रावत यांचेवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ आज दिनांक १२/०५/२०२३ शुक्रवारला सर्व व्यापारी प्रतिष्ठान यांनी स्वतःहून आपापली प्रतिष्ठाने बंद केले. व मूलच्या शांत शहरात इतिहास नोंद करणारी व शांतता सुव्यवस्था बंद करणारी पहिली घटना असल्याने सर्वांनी आप आपल्या परीने या घटनेचा निषेध नोंदविला. सकाळी गांधी चौकात अतिशय शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन करण्यात आला. आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, समता परिषद, माळी महासंघ, आरपीआच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होऊन आपले मनोगत व्यक्त करून शाब्दिक निषेध नोंदविला.* *जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन* *झालेल्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे मोठ्या गंभीरतेने बघितले जात आहे. रावत यांच्यावर गोळी झाडणारा त्यांचा विरोधक कोण आहे? या दिशेने पोलीस तपास करीत असल्याने दिनांक १२ मे २०२३ रोजी दुपारी ४ वाजता चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रशिंह परदेशी मुल येथे तपासाच्या गंभिरतेने आले असता मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे हल्लेखोरांना शोधून कारवाई करावी.व संतोषसींह रावत यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी केली. निवेदन देताना कृषी बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक व माजी अध्यक्ष घनश्याम येनुरकर, संचालक अखिल गांगरेड्डीवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले,शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार,महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार,ग्रामीण काँग्रेस नेते राजू पाटील मारकवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,एड.नीलेश हरले,संचालक राहुल मुरकुटे,कैलाश चलाख,बंडू गुरनुले,किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष रुमदेव गोहणे,चंद्रकांत चटारे,विनोद कामडे, आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.*
*सी.सी.टिव्ही फुटेजवर लक्ष केंद्रित* *रावत यांचेवर चंद्रपूर पासूनच हल्लेखोरांनी कारमधून पाठलाग केला. रावत सायंकाळी ६ वाजता घरी पोहचताच त्यांच्या घराच्या समोरून आली.व रावत स्कुटीने घराबाहेर पडताच मागे हल्लेखोरांची गाडी निघाली. परंतु मध्येच दोन इतर वाहन आल्याने रावत पुढे निघून गेले. रावत बँकेत गेल्याचे त्यांना माहीत होताच हल्लेखोरांनि गाडी बँकेच्या समोर नागपूर रस्त्यावरच उभी केली. रावत बँकेतील बैठक आटोपून रात्री ९.२० वाजता बाहेर पडताच उभ्या असलेल्या गाडीतील एक बुरखाधारी हल्लेखोर मागच्या दारातून बाहेर आला आणि काहीही कळायच्या आत त्याने रावत यांच्यावर गोळीबार केला.*
*गोळी चुकल्याने बंदुकीची गोळी रावत यांच्या हाताला चाटून गेली. यामुळे रावत थोडक्यात बचावले. हा घटनाक्रम सी.सी.टी.व्ही.फुटेजमध्ये दिसून येत आहे. मूल शहरात अचानक झालेल्या या घटनेने शांतताप्रिय मूल शहराची प्रतिमा हल्लेखोरांनि मलिन केली आहे .या घटनेने एकच खळबळ उडाली असून हल्लेखोर तात्काळ कसे सापडतील या दिशेने पोलिसांनी तपास चालविला असला तरी गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हाहन आहे.*