राकेश रत्नावार सभापती तर उपसभापती पदावर राजेंद्र कन्नमवार यांची अविरोध निवड

33

*कृषी उत्पन्न बाजार समीती मूलची निवडणुक*

*मूल : आज अठरा सदस्यीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर राकेश रत्नावार यांची तर उपसभापती पदावर राजेंद्र कन्नमवार यांची अविरोध निवड झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत सभापती आणि उपसभापती पदाची निवडणुक पार पडली. हमाल मापारी मतदार संघातून एका संचालकाची अविरोध निवड झाल्यानंतर उर्वरीत १७ संचालक पदासाठी गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक झाली. झालेल्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या वडेट्टीवार रावत गटाचे १६ तर व्यापारी मतदार संघातून एक अपक्ष संचालक निर्वाचित झाले. हमाल तोलारी मतदार संघ आणि व्यापारी मतदार संघातून निर्वाचित झालेल्या दोन्ही संचालकाने वडेट्टीवार रावत गटाला समर्थन जाहीर केल्याने समितीवर वडेट्टीवार रावत गटाची एक हाती सत्ता आली. त्यामूळे सभापती उपसभापती पदाची निवड अविरोध होईल. हे सर्वश्रृत होते. आज दुपारी समितीच्या सभागृहात सभापती उपसभापती पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. सभापती पदाकरीता राकेश रत्नावार आणि उपसभापती पदासाठी राजेंद्र कन्नमवार या दोघांनीच नामनिर्देशन दाखल केले, त्यामूळे निवडणुक निर्णय अधिकारी यांनी राकेश रत्नावार यांची सभापती तर राजेंद्र कन्नमवार यांची उपसभापती पदावर अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सभापती उपसभापती पदाच्या निवडीनंतर स्थानिक काॅंग्रेस भवनात छोटेखानी सत्कार समारंभ संपन्न झाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात व ऍड.बाबासाहेब वासाडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी शेखर धोटे, संचालक संदीप गड्डमवार, पांडूरंग जाधव, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काॅंग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते अशरफभाई मिस्त्री आदिनी नवनिर्वाचित सभापती राकेश रत्नावार आणि उपसभापती राजेद्र कन्नमवार यांचा सत्कार केला. यावेळी राकेश रत्नावार यांनी मनोगत व्यक्त केले. एड.बाबासाहेब वासाडे यांनी संतोष आता पुढे गेल्याशिवाय थांबणार नाही. सक्षम नेतृत्वाचे धनी असल्याने आपण त्यांचे पाठीमागे उभे राहू अशी प्रशंसा जिल्हा मध्यवर्ती केली. सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी विरोधकांच्या खोटया प्रचाराला बळी न पडता मतदार आणि कार्यकर्त्यांनी माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि आपल्याप्रती विश्वास व्यक्त केल्याने समितीवर एक हाती सत्ता प्रस्थापीत करता आली, याबद्दल कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले. तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले यांनी संचालन तर आभार माजी सभापती घनश्याम येनुरकर यांनी मानले. यावेळी नवनिर्वाचित सर्व संचालक यांचे शिवाय जिल्हा व तालुका शहर काॅंग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.*