चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर मूल येथे गोळीबार . संतोष रावत नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले .

71
  • *या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक १२ मे रोजी संपूर्ण मूल शहरात सर्व छोटे मोठे व्यापारी प्रतिष्ठानें बंद ठेऊन सर्वांनी कळकळीत स्वंयस्फूर्त हडताळ करून संतोष रावत वर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली.*

*मूल (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर आज गुरुवार दि.११ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मुल येथे गोळीबार करण्यात आला . या हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला गोळी स्पर्शून गेल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली .*
*हल्लेखोर स्विफ्ट डिझायर गाडीने आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूर मार्गे पसार झाले .*
*-सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे सी.डी.सी.सी.बँक शाखा मुल समोरून आपल्या स्कूटीकडे जात असताना बँकेचे समोर काही अंतरावर रोडवर उभ्या असलेल्या स्विप्त गाडी नंबर MH 34 6152 या गाडीत बसून असलेल्या बुरखा धारक व्यक्तीने रावत यांचेवर गोळीबार केला. गोळी डाव्या हातावर लागली व.थोडी दुखापत झाली. गोळी झाडताच गाडी पसार झाली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली. गोळी हातावर लागून बाहेर गेल्याने थोडक्यात बचावले. मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.*
*या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक १२ मे रोजी संपूर्ण मूल शहरात सर्व छोटे मोठे व्यापारी प्रतिष्ठानें बंद ठेऊन सर्वांनी कळकळीत स्वंयस्फूर्त हडताळ करण्यात आले आणि मूल येथील गांधी चौकात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून चक्काजाम आंदोलन केला व संतोष रावत वर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली.*
*मूल शहरात संतोष रावत यांच्यावरील गोळ्यां झाडून करण्यात आलेला हा हल्ला परंतु संतोष रावत सुदैवाने या हल्ल्यात बचावले परंतु मूल शहराची शांतिप्रिय प्रतिमा हल्लेखोंरानी मलिन केली आहे.*
*नुकतेच पार पडलेल्या बाजार समितींच्या निवडणुकीत झालेली काँग्रेस ची दुफळी तसेच संतोष रावत ला मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या अध्यक्षपदावरुन ही हटविन्या करिता ही षड्यंत्र रचनारी मंडळी आणि आत्ता संतोष रावत वर करण्यात आलेला हा नियोजित प्रा णघातक हल्ला परंतु ते सदैवाने यात वाचले हे सर्व प्रकार लक्षात घेता सदर प्रकर्णाचि सी आय डी चौकशी होने अत्यावश्यक आहे .*