सरदार पटेल महाविद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

45

 

*( साभार प्राप्त जर्नालिस्ट माधुरी कटकोजवार चंद्रपुर )*

*महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने आज दि १मे २०२३ ला स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात प्राचार्य डॉ.पि.एम.काटकर यांचे हस्तेनियोजीत वेळेनुसार ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगित म्हटल्या नंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. माननीय प्राचार्य डॉ.काटकर यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने केलेल्या मार्गदर्शनपर भाषणातुन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ स्वप्नील माधमशेट्टीवार यांचेसह कला,वाणिज्य विज्ञान व इतर सर्व विभागांचे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.*