सोमेश कलेटवाड यांना पोलिसानी केलेल्या मारहानीचा निषेधार्थ आंदोलनाची तयारी

61

 

*नांदेड :-*
*देगलूर शहरात आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या सोमेश कलेटवाड या शेतकऱ्यांस, पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणात,*
*आरोपी विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा आदिवासी समाजाचे नेते सोपानराव मारकवाड यांनी मा. जिल्हाधिकारी नांदेड,यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.*

*२२ जानेवारी २३ रोजी जागेचा वादउच्च न्यायालयात प्रकरण चालू असताना व देगलूर तहसीलदार यांचा मनाईहुकूमचे उल्लंघन करून,देगलूर पोलिसाकडून अतिक्रमण करत असलेल्या खाजगी जागेबाबत विचारणा केली असता, पोलिसाकडून सोमेश कलेटवाड यांना मारहाण करून जखमी केले आहे.*

*पोलीस उपअधिक्षक सचिन सांगले,पोलीस निरीक्षक सोहन माछरे,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे व तीन चार, पोलिसांनी सोमेश कलेटवाड यांना मारहाण केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक,पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन चार महिने झाले तरी काहीही कार्यवाही केली नाही अस्या आशयाचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.*

*सोमेश कलेटवाड यांना न्याय देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाद्वारे देण्यात आला.या निवेदनावर सोपानराव मारकवाड,*
*श्याम निलंगेकर, दत्तात्रय अन्नमावाड,ऍड.सुधीर राऊतवाड,काकासाहेब डावरे,माधवराव अडबलवाड, गोंविंदराव बेंबरे, शिवराम बोधगिरे,बाबाराव इरलेवाड,दीपक कसबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..*