मोदी सरकार हुकूमशाहीने लोकशाहीची हत्या करीत आहे. काँग्रेस सत्याग्रह आंदोलन करुन रस्त्यावर उतरेल आणि याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारवर राहील- संतोषसिंह रावत

52

*( श्री गुरु गुरनुले यांच्या कडून साभार प्राप्त)*

*मुल – काँग्रेस नेते मान.राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारच्या भ्रष्ट व हुकूमशाही विरोधात संसदेत व जनमानसात लढा देऊन सत्य समोर आणले.त्यामुळे मोदी सरकार व भाजपने राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रकार करुन सुरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन संसद सदस्य रद्द करण्याचा निर्णय घेतला. उलट खोटे आरोप करून भाजपच आंदोलन करीत आहे.* *अशा हुकुमशाहा बनलेले केंद्रातील मोदी सरकार सत्तेचा दुरुपयोग करुन सर्व सामान्य जनतेचा कष्टाचा पैसा आणि राष्ट्राच्या संपत्तीची उघडपणे लुट करत असुन अदानी सारख्या कर्ज बुडव्यांना संरक्षण देत आहे. केंद्र शासनाची ही कृती देशाला विघातककडे नेणारी असुन जनतेच्या विश्वासाला तडा पोहोचवणारी आहे. केंद्र शासनाच्या या कृतीचा जनतेला भविष्यात धोका होवु नये म्हणुन जनतेनी वेळीच सावध व्हावे. हा उदात्त उद्देश डोळ्यासमोर केंद्र शासना विरूध्द जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी व लोकशाहीचे रक्षण करण्याकरीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देशातल्या कानाकोप-यात जय भारत सत्याग्रहाचा शुभारंभ केला आहे.*
*लोकशाहीची हत्या करीत असलेल्या सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करीत असताना काॅंग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्याही विरोधात शासन यंञणेचा दुरूपयोगा करून कुंभाड रचत आहे. ही बाब निषेधार्ह आहे. हुकुमशाही करणाऱ्या केंद्र सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणत असतांना राहुलजी गांधी यांनी स्विकारलेला आक्रमकपणा मूळे भविष्यात भाजपाला धोका होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेवुन राहुलजी गांधी यांचे विरोधात अनेक ठिकाणी खोटे खटले दाखल करण्याचे कारस्थान मोदी सरकारने चालविले आहे. अशाच एका जुन्या प्रकरणात राहुलजी गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावतांना न्यायालयाने त्यांना एका महिन्यात अपील करण्याची संधी दिली आहे. असे असताना वरीष्ठ न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा न करता दबावतंञाचा वापर करून दुसऱ्याच दिवशी राहुलजी गांधी यांचे लोकसभा सदस्य पदावरून निष्कासन केले. नव्हे तर त्यांना शासकीय बंगला खाली करण्याची सुचना सुद्धा दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या महीण्याभराची प्रतिक्षा न करता भाजपच्या मोदी सरकारला काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांचे विरूध्द कारवाई करण्यासाठी एवढी घाई कां सुटली ? अशीच घाई मग महागाई कमी करण्यासाठी, युवकांना रोजगार देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी, मोदी सरकार का करत नाही. आणि यापूर्वीही काही संसद सदस्यांवर गंभीर आरोप झाले असताना आजही ते सरकारी बंगल्यामध्ये राहत आहेत,मग राहुल गांधींनाच बंगला खाली करण्याची एवढ्या तातडीने नोटीस देण्याची घाई का, असा प्रश्न चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी केला असून याच हुकूमशाही वृत्तीचा काँग्रेस पक्षातर्फे सर्वत्र निषेध करण्यात येत असून याला देशातील राज्यातील,जिल्ह्यातील, तालुक्यातील समस्त जनतेचा पाठिंबा मिळत असून राहुलजी गांधी यांच्या पाठीमागे सारा देश उभा आहे. असल्याचे सांगितले. यानंतर ग्रामीण भागात प्रतेक गावात निषेध जनआंदोलन उभारून काँग्रेस रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.आणि याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र व राज्य सरकारवर राहील असे मत संतोष सिंह रावत यांनी मुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.* *मुल तालुका काँग्रेस कमिटीने पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते, सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, माजी न.प.उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष राकेश रत्नावार, माजी तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष घनश्याम येनुरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार,शहर अध्यक्ष सुनील शेरकी, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष व माजी संचालक अखिल गांगरेड्डीवार, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार, माजी संचालक किशोर घडसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य बंडू गुरनुले, युवा धडाडीचे नेतृत्व प्रशांत उराडे, ओबीसी काँग्रेस सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, महिला काँग्रेसच्या वैशाली काळे,शामला बेलसरे, कल्पना म्हस्के, मल्लेश यारेवार, नवेगाव भुजल्ला सोसायटीचे अध्यक्ष सुमित आरेकर यांचेसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.*