*मुल – बहुजन समाजाला शिक्षणाचे धडे देणारे,चातुर्वर्ण्यव्ययस्थेविरुद्ध व जातिप्रथेविरुद्ध बंड करून बहुजन समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य व सामाजिक न्याय अशा मानवतावादी मूल्यांचे बीजारोपण करणारे, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे, पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती उत्सव साजरी करणारे आणि ,सत्यशोधक समाजाची*
*स्थापनाकरणारे ,शिक्षणतज्ज्ञ,उद्योजक थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न,भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचाराणे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संघटन व संघर्ष करूनच सर्व सामान्य जनतेची सेवा करुन न्याय मिळऊन द्यावा लागेल असे मार्गदर्शन काँग्रेस नेते, सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केले. सोबतच आरोग्य,शिक्षण,रोजगार अशा अनेक समस्या वर प्रकाश टाकला.* *मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुरु -शिष जयंती निम्मित प्रतिमेला माल्यारपण करतांना बोलत होते. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनी दोन्ही महात्म्यांच्या कार्यावर विस्तृत माहिती दिली.तर आंबेडकर विचारवंत कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक किशोर घडसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवर यांचे हस्ते क्रांती सूर्य महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन व मालारपण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमाला माजी अध्यक्ष सं.गांधी.निराधार योजना समिती व माजी न.प.उपाध्यक्ष राकेश रत्नावार,माजी तालुकाध्यक्ष व माजी सभापती घनश्याम येनुरकर, विविध कार्य.सह सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार ,माजी अध्यक्ष व संचालक राजेंद्र कन्नमवार, माजी संचालक डॉ.पद्माकर लेंनगुरे, बंडूभाऊ गुरणुले, माजी जी.प.सदस्य मंगला आत्राम, व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे, युवक अध्यक्ष पवन नीलमवार, माजी न.प.सदस्य अलिता फुलझेले,विनोद कामडे,हसन वाढई, गंगाधर घुगरे , सुबोध बुग्गावार,शहर उपाध्यक्ष कैलाश चलाख, सरपंच भांडेकर, संदीप मोहबे, अन्वर शेख,विष्णू सादमवार, गंगाधर कुंनघाडकर, सुरेश फुलझेले, तुलाराम घोगरे, शामलता बेलसरे, वैशाली काळे,कल्पना म्हस्के,राधिका बुक्कावार,सविता मारटकर,उमा बेलसरे,पापिता टिंगुसले,वैशाली घुगरे, यांचेसह शहर व ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले.*