विठ्ठल मंदिर प्रभागात आंतरराष्ट्रीय महिला दिनी दिनांक ८ मार्च २०२३ ला सत्कार समारंभ व महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन

38

 

*( दीपक कटकोजवार यांच्या कडून साभार प्राप्त )*

*विविध क्षेत्रातील मान्यवर महिला भगिनींच्या सत्कार समारंभाचे दि.८मार्च २०२३ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, विठ्ठल मंदिर प्रभाग महिला काॅंग्रेसच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यात भारतजोडो यात्री प्रेरणा सुभाषसिंह गौर, महिला पतंजली योग समिती महामंत्री सौ.अपर्णा प्र.चिडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ.अनिता नरेंद्र बोबडे, महिला पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी नसरीन शेख, समाजसेविका श्रीमती शालिनी भगत आदी सत्कारमुर्तींना सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यक्रमाच्या आयोजीका शोभाताई वाघमारे यांनी दिली आहे याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाघाटन जिल्हा ग्रामीण महिला कांग्रेस अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांचे हस्ते चंद्रपूरच्या माजी नगराध्यक्षा व काॅंग्रेसच्या जेष्ठ नेत्या सौ.सुनिता लोढिया यांचे अध्यक्षतेखाली होणार असुन शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी, माजी शहर जिल्हा अध्यक्ष नंदु नागरकर,शहर जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्षा सौ.संगिता अमृतकर, माजी उपमहापौर वसंत देशमुख आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महिलांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे*