आज माझ्या सर्व ग्रुपच्या मैत्रीनीसाठी

72

 

*( सौ. रागिनी अडपवार यांच्याकडून साभार प्राप्त )*

*कालच हिनाताई शहा आपल्याला सोडून गेल्या बघा किती करोडपती घरी असल्या तरी मरण हे शाश्वत आहे त्याला कोणीही थांबवू शकत नाही….त्यामुळे उदया काय होईल याचा विचार न करता आपण आजचा दिवस आनंदाने जगला पाहिजे असे माझे मत आहे .कधी काय होईल हे आपल्याला माहीत नसते.*

*जीवन जगून घ्यावे…किती छान वाटत..मनभरून,मनापासून,भरभरून रोज नव्यावे जगताना भारी आवडते….रोज दिवस उगवतो…..किती गेलेत दिवस गणती त्याची केली.नाही किती उरले तेही माहिती नाही…….पण आनंदाने जगणे,जमून गेले.गोष्ट छोटीशी पण लाखमोलाची…..*
*काहीच लागत नाही….मनासारखे जगायला,पण दृष्टीकोन बदलावा मग सुंदर स्वच्छ जगणे होते….*
*कुणी काहीही बोलले तरी मनमुराद जगणे सोडायचे नसते…..का म्हणून आपण कुणाच्या काहीही बोलण्याचा मनावर परिणाम करून घ्यायचा.*

*नाहीच जमत कुणाकुणाला मनसारखे जगणे….पण मी म्हणते का हो जगावे मनमारून जगणे…..हे जगणे होतच नाही….मन असावे आनंदी मग आहे त्या परिस्थितीत आनंदी जगणे सहज सोपे होते….देव सुध्दा त्याच्या निर्मितीवर खुश झाला पाहिजे,की मी काय कलाकृती बनवली आहे…..कुणासाठी सत्कार्य केले समाधान वाटते…माझी आई नेहमी महणायची की देवा समोर बसून राहण्यापेक्षा मुके,बहिरे ,अनाथ व्यक्तीची सेवा करावी जास्त पुण्य लाभते…..आपल्या घरी आलेला भिकारी सुद्धा एक प्रकारचा देव च आहे .त्याला पाणी, पोठभर जेवण दिलं की त्याचा आनंद बघा चेहऱ्यावरचा ….आपल्याला आनंद मिळतो ..छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो बघा आपल्याला तो घेता यायला हवा,*

*मनास आनंदी ठेवणे म्हणजे,जे मनाला पटते ते करण्याची सवय लावून घेने काम,त्यात रमुन जाता येत…निसर्गात फिरायला जाव.काय मन आनंदी होत म्हणून सांगू,अहाहा भारी वाटत हो….त्यासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे…नाहीतर वेळ नाही वेळ नाही जगणेच विसरून जातो…..*
*काय लागत मस्त जगायला तर मी म्हणेन एक छान प्रसन्न मन,सकारात्मक दृष्टी,आणि स्वतःला ओळखलं की झालेच आपले जीवन सुंदर…..ज्यास हे समजले त्यास जीवन जगणे उमजले…….*
*कुणी काय म्हणेल तिकडे लक्ष मात्र द्यायचं नसत….हे जमल की मग तक्रारीला जागाच उरत नाही…..किती कराव्या बाई तक्रारी तरी…..त्या तर संपवूनच टाकाव्या….मग जगणे उत्सव झालेच म्हणून समजून जावे ???????*