आदरणिय अजित पवार साहेबांनी ‌केले पठाण साहेबांचे कौतुक

57

 

*मुंबई (असलम मामदानी)*

*दिनांक 17/01/2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अँड.मोहम्मद खान पठाण साहेब यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय श्री. अजितदादा पवार साहेब याची भेट घेतली. आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाअंतर्गत केलेल्या कामाचे कौतुक करून अँड.मोहम्मदखान पठाण साहेब यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले व त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा व्यक्त केली.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस मा. श्री शिवाजीराव गर्जे पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष मा. श्री हेमंत टकले साहेब हे आवर्जून उपस्थित होते.*