गेट तयार झाले बसण्याकरिता खुर्च्या लागल्या मात्र बसेसच्या वेळा कडे कुणाचेही लक्ष नाही

45

*(विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण ?)* .

। *मुल – शाळकरी विद्यार्थ्यांचे मागील तीन वर्षभरापासून शैक्षणिक नुकसान होत आहे ,मात्र याकडे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मुळीच लक्ष नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी मंत्री यांनी विद्यार्थ्यांच्या समस्येची बाब परिवहन अधिकर्याशि प्रत्यक्ष बोलून लक्षात आणून दिली तरी एक महिना झाला पण काहीही बदल झाल्याचे दिसत नाही.राज्य परिवहन विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. समाजसेवकही विद्यार्थ्यांच्या हिताची मागणी लाऊन धरत नाही. यांचेही लक्ष नाही .*
*स्मार्ट सिटी म्हणून मूल नगरचे नाव महाराष्ट्रात पुढे आहे. तालुक्याचे ठिकाण आहे,* *ग्रामस्थांचे मुख्य केंद्र असल्याने मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून वर्ग पाचवी ते पदवी पदव्युत्तर पर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्याकरिता रोज ये-जा करतात शाळांच्या व महाविद्यालयाच्या वेळा दोन टप्प्यात ठेवण्यात आल्या आहे. सकाळ पाळीत आणि दुपार पाळीत अशा शिफ्ट मध्ये आहेत काही शाळा महाविद्यालय सकाळ पाळीत सकाळी ७-०० ते ११-३० पर्यंत आणि काही दुपार पाडीत ११-३५ ते ५-३० पर्यंत भरतात सकाळ पाळीत शिकणारे विद्यार्थी दररोज दोन तासिका झाल्यानंतर शाळेत परिवहन महामंडळ च्या बस ने येऊन पोहोचतात तर शेवटच्या एक-दोन तासिका व्हायच्या आधीच बसची वेळ झाली असे शिक्षकांना सांगून काही विद्यार्थी निघून जातात, बस वेळेच्या संदर्भात गडचिरोली व चंद्रपूर एसटी डेपोला विचारणा केली तर एक दुसऱ्याचे कारणे सांगतात चंद्रपूर डेपो ला फोन द्वारे विचारणा केली तर बस गडचिरोली वरून येणार असं सांगतात आणि गडचिरोली डेपोला विचारणा केली तर चंद्रपूर ची बस येणार असं सांगतात. परिवहन अधिकाऱ्यांच्या अशा बनवाबनवीच्या उत्तरामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू आहे, मात्र या गंभीर व महत्वाच्या प्रश्नाकडे शासनाचे, परिवहन विभागाच्या अथवा कोणाचेही लक्ष नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. एखाद्या रविवारी विद्यार्थी आगाऊ शिकवणी वर्गाकरिता येत असतील किंवा टायपिंग,कंप्युटर क्लासेस करण्यासाठी व परीक्षेला येत असतील अशा वेळेस रविवारी प्रवास करता येत नाही असं सांगत तिकिटाचे पैसे द्या अन्यथा पास फाडून टाकीन अशी धमकी बस वाहकाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाते, आणि इतर साधारण बस मध्ये बसण्यास विद्यार्थी विनंती केली तर विद्यार्थ्यांना बसू दिल्या जात नाही. काही शाळकरी विद्यार्थिनींना चक्क बस मधून ढकलून खाली उतरल्या बद्धलची मुलींची तक्रार आहे.ही अतिशय गंभीर बाब आहे*
*आधीच कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे दोन वर्ष असेच विना शिकता गेले, ऑनलाइन शिक्षणाच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी इंटरनेटची नेटवर्किंग सेवा बरोबर नसल्याने असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. वर्ग तिसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी सरळ पाचवी मध्ये प्रवेशित झाला, आठवीमध्ये शिकणारा विद्यार्थी एकदम दहावी मध्ये गेला ,तर अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी सरळ सीनियर कॉलेजला म्हणजे पार्ट वन मधे बसतो आहे अशी शिक्षणाची दशा झाली आहे. आणि आता या चालू सत्रापासून सुरळीत शाळा महाविद्यालय सुरू झालेत. त्यात परिवहन एसटी महामंडळाची आणि अधिकाऱ्यांची ही बनवाबनवी मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे ,या गंभीर बाबीकडे कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे विरोधी नेत्यांचे , समाजकारण्याचे व परिवहन अधिकाऱ्यांचे शिक्षणासारख्या महत्वाच्या अत्यावश्यक असणाऱ्या बाबीकडे लक्ष नाही, याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून घ्याव्यात अशी तालुक्यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांच्या पालकांची, विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची, ग्रामीण ग्रामस्थांची व जनतेची एकमेव मागणी आहे.*