वैष्णवी बंसोड, तुषार देवतळे यांची विभागीय ज्युडो स्पर्धा करिता निवड

56

*हिंगणघाट:-*
*वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा स्तरावरील शालेय ज्युडो स्पर्धेत महेश ज्ञानपीठ हिंगणघाट ची वैष्णवी बंसोड आणि तुषार देवतळे यांनी यश संपादन करून शाळेला नाव लौकीक मिळवून दिला.*
*वर्धा येथे आयोजित जिल्हा स्तरीय ज्युडो स्पर्धेत १४ वर्षे वयोगट आणि ४० किलो वजन गटात स्पर्धा होऊन यात त्यांनी यश संपादन केले.*
*विभागीय स्पर्धे साठी झालेल्या निवडी बद्दल त्यांनी या विजयाचे श्रेय शालेचे व्यवस्धापक, प्राचार्या , तथा क्रिडा शिक्षक श्री मुस्तफा हबीब बख्श सर, सचिन मुले सर व सर्व शिक्षक वृंदांना दिले.*
*त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.*