शेलुवाडा येथील मुस्लिम कब्रिस्तान रस्त्यासह शेताच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा जनआंदोलन -पुंजानी

57

*प्रतिनिधी। कारंजा (लाड)*

*तालुक्यातील ग्राम शेलुवाडा येथे मुस्लिम कब्रस्थान व त्याच मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असलेल्या मार्गावर गायवळ पाझर तलावाचे पाणी नेहमी साचत असल्यामुळे गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृतदेहाला अंतिम संस्कार करण्याकरिता साचलेल्या पाण्यातून मोठ्या कसरती ने जावे लागते. प्रशासनाने तत्काळ मुस्लिम कब्रिस्तान रस्त्यासह शेताच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी नेते मो.युसुफ पुंजाणी यांनी दिला आहे.*
या बाबत सविस्तर असे की, याच मार्गाने बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असून त्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पीकाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे.ग्राम शेलूवाडा येथील नागरिकांची ही गंभीर समस्या असून या बाबत संबंधित प्रशासनाची डोळेझाक होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या संदर्भात नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मो. युसूफ पुंजानी यांनी ग्राम शेलूवाडा येथे भेट देऊन मुस्लिम कब्रस्थान मार्ग व या मार्गावरील शेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व या बाबत संबंधित प्रशासनाशी संपर्क केला असता पुढील काही दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे परंतु संबंधित प्रशासनाने या रस्त्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावला नाही तर नागरिकांच्या हितासाठी भव्य जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी पुंजानी यांनी दिला तसेच याबाबत विधानसभा विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्राम शेलूवाडा येथील शे मजिद पटेल,शे वाहब शे अजीस,शे रशीद,शे कादर,मुफ्ती वाजीद अली,सै एजाज,समद खान,नईम खान,शे जब्बार,बिस्मिल्ला खान,शे रज्जाक ,शे राजीक, शे सादिक,शे अलीम,शे सादिक शे युसुफ आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.